प्रतिनिधी /बेळगाव
भारतीय टेडर्स आणि यश कम्युनिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश चतुर्थीनिमित्त दि. 6 ऑगस्ट ते 15 ऑगस्टदरम्यान शॉपिंग उत्सव कंझ्युमर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. रेल्वे ओव्हरब्रिज येथील मराठा मंदिरच्या भव्य सभागृहात भरलेल्या या प्रदर्शनामध्ये 60 हून अधिक कंपन्यांनी सहभाग घेतला आहे.
या प्रदर्शनात ब्रॅण्डेड गार्मेंट शर्ट्स, ट्राऊजर, पार्टी वेअर, कॅज्युअल वेअर, शर्ट्स, टी शर्ट्स, स्पोर्टवेअर, लोअर, ब्रॅण्डेड जिन्स, कॉटन बर्मुडा, बेल्ट, सॉक्स, विंटर वेअर, हुडी, स्वेटर, लेगीन, स्वेटर शर्ट तसेच महिलांसाठी पिंटेड कुर्ती, टॉप्स, जिन्स, लेगीन, पायझमा, स्वेटर्स, कॉर्डिनन्स, जॅकेट्स, पर्स आणि वेगवेगळय़ा प्रकारच्या ब्रा व पॅन्टी उपलब्ध आहेत. याचबरोबर खादी शर्ट व शूजदेखील आहेत. हे सर्व ब्रँडेड गार्मेंट्स एमआरपीपेक्षा 60 टक्के कमी दराने विकले जात असल्याने पावसातही खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. शॉपिंग उत्सवमध्ये स्वच्छता उपकरणे, स्पीड ऍम्प्ररी, ओकाया कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर, वीणा वर्ल्डतर्पे प्रवासोध्यम, आयुर्वेदिक प्रसाधने, आर्टिफिशियल ज्वेलरी, केरळा हलवा, म्हैसूर नमकीन, हॅण्डलूम हॅण्डिक्राफ्ट, किचनवेअर, बिलिंग मशीन, नाचना, पापड, चुरण, राजस्थानी मोजडी, मसाज ऑईल, लेडीज गाऊन, मॅग्नेटीक ब्रेसलेट, साडय़ा, बांगडय़ा, बी. एस. ग्रुपचे तुलसी खजुर, याचबरोबर स्टडी टेबल, मॅजिक बुक टॅब, रंगोली उत्पादने, युरेका फोर्बची उत्पादने, कलाकुसरीचे झुले, लाकडी फर्निचर, एअर रिंग्जस, लहान मुलांची खेळणी, खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल यामध्ये केक, बेकरी उत्पादने, कोल्हापुरी भेळ, पाणीपुरी याचबरोबर थालीपीठ, आप्पे, चहा, कॉफी उपलब्ध आहेत.
या प्रदर्शनात प्रवेश मोफत असून, नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन केले आहे. ग्राहकांसाठी लकी ड्रॉ असून, प्रत्येक व्यक्तीला बक्षीस जिंकण्याची संधी आहे. रोज सायंकाळी काढण्यात येणाऱया लकी ड्रॉमध्ये विजेत्यांना बक्षिसे दिली जात आहेत. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही किंवा वस्तू खरेदीचे बंधन असणार नाही.