Tarun Bharat

बेळगाव जिल्हात केएमएफ तर्फे होणार भव्य तालुकास्तरीय सायकलिंग स्पर्धा

बेळगावात तालुकास्तरीय सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती बेळगांव जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष अनिल पोतदार यांनी दिली .

आज बेळगावच्या महांतेशनगर येथील केएमएफच्या सभागृहात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्तरावर सायकलिंगचा प्रचार करण्याच्या उद्धेशाने ही स्पर्धा घेण्यात येत आहे.

१ डिसेंबर ते ३० डिसेंबरच्या दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. १५ शैक्षणिक तालुक्यातील ८वी ते १०वी पर्यंतच्या विध्यार्थ्यां म्हणजेच ५० मुलं आणि २५ मुली असे एकूण ७५ विध्यार्थी सहभागी होणार आहेत. तालुकास्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्याना जिल्हा आणि आगामी राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे . (बाईट – अनिल पोतदार)

या पत्रकार परिषदेला केएमएफचे संचालक जी श्रीनिवास, सुरेश पुजारी, डॉक्टर बसवराज परवन्नवर, बीव्ही कट्टी, व इतर उपस्थित होते .

Related Stories

के. आर. शेट्टी किंग्स, विश्रुत स्ट्रायकर्स उपांत्य फेरीत

Amit Kulkarni

बाराव्या दिवशीही बस बंद, प्रवाशांना घ्यावा लागतोय रेल्वेचा आधार

Amit Kulkarni

त्या अधिकाऱयांना न्यायालयीन कोठडी

Patil_p

युनियन जिमखाना, दाभोली संघांची विजयी सलामी

Amit Kulkarni

महिलांना संवादाचे पूल जोडता आले पाहिजेत

Amit Kulkarni

आमदारावर पुष्पवृष्टी करणे पडले महागात !

Patil_p