Tarun Bharat

Solapur : मोफत आरोग्य शिबिराचा फायदा गरिब व सर्वसामान्यांनी घ्यावा- तहसीलदार समीर माने

करमाळा प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात मोफत सर्व प्रकारच्या तपासण्या करून मोफत औषधाचे वाटप सुरू आहे. शिवाय डोळ्याची तपासणी करून मोफत चष्म्याचे वाटप सुरू आहे, याचा फायदा सर्वसामान्य जनतेने घ्यावा असे आवाहन तहसीलदार समीर माने यांनी केले. या आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी बोलताना पुढे म्हणाले की पुढे होणारे मोठे आजार टाळण्यासाठी वेळेवरच शारीरिक तपासण्या होणे गरजेचे आहे. आरोग्याच्या समस्या कडे दुर्लक्ष केले तर भावी काळात मोठे आजार उद्भवू शकतात. यासाठी तपासणी करून घेणे गरजेचे आहे. आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नये असे आवाहन तहसीलदार समीर माने यांनी केले.

९ फेब्रुवारी व 10 फेब्रुवारी गुरुवार शुक्रवार असे दोन दिवस सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मोफत चष्मे वाटप व मोफत औषधाचे वाटप सुरू राहणार असून करमाळा शहर व परिसरातील लोकांनी या शिबिराचा फायदा घ्यावा असे आवाहन बाळासाहेबांचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे.

या कार्यक्रमात जिल्हाप्रमुख अनिल पाटील ,युवा सेना प्रमुख निखिल चांदगुडे, शहरप्रमुख संजय शीलवंत, तालुकाप्रमुख देवानंद बागल, उप शहरप्रमुख नागेश गुरव, युवा सेना तालुकाप्रमुख राहुल कानगुडे, सुधीर आवटे, नागेश चेंङगे, रोहित रायबासे, हिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर ,दीपक पाटणे, शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे सह कक्ष प्रमुख शिवकुमार चिवटे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

तुळजापूरात मराठा आंदोलनाच्या तिसऱ्या पर्वाची मुहूर्तमेढ

Archana Banage

सोलापूर: नई जिंदगी परिसरात खून

Archana Banage

व्हायरल झालेल्या व्हिडिओ मागे राष्ट्रवादीचा हात ; सदाभाऊ खोत यांचा आरोप

Abhijeet Khandekar

अक्कलकोट शहरात पोलीस ठाणे व नगरपरिषद कडून संयुक्त कारवाई

Archana Banage

सोलापूर : कोविड योद्धांना रांगोळीच्या माध्यमातून सलाम

Archana Banage

एनडीए निवडीचे आमिष दाखवून गंडा

prashant_c