ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Helicopter carrying devotees crashed in Kedarnath केदारनाथमध्ये भाविकांना घेऊन जाणारं आर्यन कंपनीचं हेलिकॉप्टर आज सकाळी कोसळलं. या दुर्घटनेत 6 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. केदारनाथमधील गरुडचट्टीजवळ ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन या खासगी कंपनीचं हेलिकॉप्टर गुप्तकाशीहून केदार घाटीकडे निघाले होते. तेव्हा गरुडचट्टी असलेल्या दाट धुक्यांमुळे ते कोसळले. या हेलिकॉप्टरमध्ये केदारनाथला जाणारे सहा भाविक होते. त्यांचा या दुर्घटनेत जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
घटनास्थळी पोलीस आणि बचाव पथक दाखल आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 ऑक्टोबरला केदारनाथला भेट देऊन तेथे सुरू असलेल्या विकास प्रकल्पांचा आढावा घेणार आहेत. यानंतर ते केदारनाथ मंदिरात दर्शन घेतील. रात्री तेथे मुक्काम करुन दुसऱ्या दिवशी ते बद्रीनाथला भेट देणार आहेत.