Tarun Bharat

अडचणीत आलेल्या खेळणीवाल्यांना मदतीचा हात

Advertisements

हलगा येथील ऍड. आण्णासाहेब घोरपडे यांनी घेतला पुढाकार

प्रतिनिधी/ बेळगाव

हलगा येथे नुकताच यात्रोत्सव पार पडला. मोहरमनिमित्त हलगा येथे यात्रा भरविली जाते. ही यात्रा मोठय़ा प्रमाणात असल्यामुळे खेळणीवाले, पाळणा चालविणारे येतात. मात्र, यावषी याच वेळेला जोरदार पाऊस पडला आणि हे सर्व जण अडचणीत आले. त्यांना आपल्या गावी परतण्यासाठी पैसे नव्हते. ही माहिती ऍड. आण्णासाहेब घोरपडे यांना समजताच त्यांनी तातडीने धाव घेऊन त्यांना मदतीचा हात दिला.

पोटासाठी घरदार सोडून ही मंडळी येतात. यात्रा काळात त्यांचा व्यवसाय जोमात होतो. खेळणीवाले तसेच मोठे पाळणावालेदेखील हलगा गावात दवषी दाखल होतात. मात्र, या यात्रोत्सव दरम्यानच जोरदार पाऊस झाला आणि या सर्वांचाच व्यवसाय ठप्प झाला. भाविक या यात्रेकडे कमी संख्येने फिरकले. ग्रामस्थही घरातून बाहेर पडले नाहीत. त्यामुळे व्यवसायच झाला नाही. येताना वाहने करून साहित्य घेऊन आले. मात्र, जाण्यासाठी त्यांच्याजवळ भाडय़ाची रक्कमही जमा झाली नाही.

त्यामुळे हे सर्व जण काही दिवस त्या ठिकाणीच राहिले. याची माहिती मिळताच ऍड. घोरपडे यांनी धाव घेतली. त्यांनी तातडीने आर्थिक मदत केली. यावेळी त्यांच्या सोबत राजू कालिंग, मधू घोरपडे, मोहन कानोजी आदी उपस्थित होते.

Related Stories

नैऋत्य रेल्वेचे इंजिन अखेर रूळावर

Patil_p

होसूर येथील सरकारी दवाखान्यात कोरोना योद्धय़ांचा सत्कार

Patil_p

ज्ञानाशिवाय माणूस सुखी होवू शकत नाही!

Amit Kulkarni

आरोग्य स्वच्छतेविषयी जागरुकता कार्यक्रम

Patil_p

कर्नाटक पाऊस: तातडीच्या मदतकार्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून ५० कोटींची मदत जाहीर

Abhijeet Shinde

पावसासाठी अनगोळ शिवारात देवाला गाऱहाणे

Amit Kulkarni
error: Content is protected !!