Tarun Bharat

धामणे (एस) मध्ये हत्तींचा धुमाकूळ

वन अधिकाऱयांची भेट : नुकसानभरपाईसाठी अर्जही घेतले भरुन : वन्यप्राण्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव / किणये

धामणे (एस.) येथे सोमवारी सायंकाळी हत्तीच्या कळपाने धुमाकूळ घालून ऊस पिकाचे मोठय़ाप्रमाणात नुकसान केले आहे. दरवषी या गावातील शेतकऱयांचे नुकसान वन्य प्राण्यांकडून होत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान वनखात्याच्या अधिकाऱयांनी तातडीने नुकसानग्रस्त शेतीला भेट देऊन भरपाईसाठी शेतकऱयांचे अर्ज भरून घेतले आहेत. त्यामुळे शेतकऱयांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

चोहोबाजूंनी चंदगड तालुक्मयाने वेढलेल्या आणि बेळगाव तालुक्मयात असलेल्या धामणे एस. गावाकडे दुर्लक्ष झाले आहे. दरम्यान गावाला लागून वनक्षेत्र असल्याने वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. हत्तीच्या कळपाने ऊस, भात आणि इतर पिकांच नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱयांना मोठा फटका बसला आहे. पावसाळा संपल्यानंतर दरवषी वन्यप्राणी शेतीचे नुकसान करीत असतात. मात्र वनखाते केवळ बघ्याची भूमिका घेत असते. त्यामुळे शेतीचे नुकसान गावकऱयांच्या पाचवीलाच पूजलेले आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

वनखात्याच्या अधिकाऱयांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून संबंधित शेतकऱयांच्या भरपाईसाठी अर्ज भरले आहेत. शिवाय शेतकऱयांना योग्य ती भरपाई देण्याचे आश्वासन वनखात्याच्या अधिकाऱयांनी दिले आहे. एसीएफ मल्लीनाथ कुसनाळ, आरएफओ पुरूषोत्तम रावजी, डेप्युटी आरएफओ रमेश गिरप्पण्णावर, विभागीय अधिकारी जे. बी. रजपूत, राहुल बोंगाळे आदींनी भेट दिली आहे.

रात्रीच्यावेळी शिवारात न जाण्याचे आवाहन

बटाटा, रताळी काढणी, भातकापणी आणि ऊस तोडणीला वेग आला आहे. त्यामुळे शेतकरी सुगी हंगामात मग्न झाला आहे. तर दुसरीकडे दोन हत्ती आणि त्यांच्यासोबत असलेल्या दोन पिलांनी धुमाकूळ घातला आहे. सातत्याने या हत्तींचे गावाशेजारील शिवारात दर्शन होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सावध रहावे, शिवाय रात्रीच्यावेळी शिवारात जाऊ नये, असे आवाहन वनखात्याने केले आहे.

थेट गावात हत्तींनी प्रवेश केल्यामुळे भीती

सोमवारी रात्री अकराच्या सुमारास अचानक चार हत्ती गावात आले असल्यामुळे  परिसरात खळबळ उडाली आहे. या हत्तींना ग्रामस्थांनी हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र सदर हत्ती रात्रभर ठाण मांडून तेथेच आहेत, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.

धामणे एस गावातील गावडू हजगोळकर यांनी वनखात्याच्या अधिकाऱयांना गावात हत्ती आले असल्याची माहिती दिली.

धनगरवाडी धामणे गावात हत्ती आले असल्यामुळे शेतकऱयांची झोप उडाली आहे. ऐन सुगी हंगामात शिवारात नव्हे तर थेट गावात हत्तींनी प्रवेश केला असल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नाचणा-ऊस पिकांचे मोठे नुकसान

बबन कोकर, काळू लांबोर यांच्या शेतातील नाचणा, ऊस पिकांचे हत्तींनी नुकसान केले. त्यांनी मंगळवारी गोळकर रामचंद्र हाजगोळकर यांच्या शेतातील ऊस पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान केले आहे.

Related Stories

‘जीएसएस’तर्फे ‘मिराकी युवा महोत्सव’ला प्रारंभ

Omkar B

गुंजी माऊली देवीचा पालखी सोहळा नियमांचे पालन करुन झाला साजरा

Patil_p

गणित विषयाच्या पेपरला 269 विद्यार्थ्यांनी मारली दांडी

Patil_p

बेळगाव रेल्वेस्थानकात एटीव्हीएम मशीन पुन्हा कार्यान्वित

Amit Kulkarni

विचित्र रहस्याचा मागोवा अँटलर्स

Patil_p

अनिष हेगडे यांची रेल्वे जनसंपर्क अधिकारीपदी नियुक्ती

Amit Kulkarni