मोठा खर्च करून थडग्यांसोबत काढतो छायाचित्रे
जगात वेगवेगळे छंद असणारे लोक आहेत. कुणाला नैसर्गिक सौंदर्याच्या ठिकाणी जाण्याची आवड असते. तर काही जणांना ऐतिहासिक ठिकाणी जाण्याचा छंद असतो. परंतु एका व्यक्तीला थडगी आणि दफनभूमींच्या ठिकाणी जाण्याचा अजब छंद आहे. जगातील प्रसिद्ध लोकांच्या थडग्यांच्या ठिकाणी जात छायाचित्रे काढून घेण्याचा त्याला छंद आहे.
मार्क डबास नावाच्या व्यक्तीला अजब छंद असून तो प्रसिद्ध लोकांच्या थडग्यांच्या ठिकाणी जात तेथे छायाचित्रे काढून घेत असतो. या व्यक्तीने असे करण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च करण्यासही मागे पुढे पाहिलेले नाही. आतापर्यंत 700 दफनभूमींना भेट दिलेल्या मार्कला वेगळाच ध्यास आहे. या जगाचा निरोप घेतलेल्या लोकांना दफन करण्यात आलेल्या ठिकाणी तो जात असतो.
प्रसिद्ध व्यक्तींच्या दफनभूमीला भेट
49 वर्षीय मार्क जगातील विविध ठिकाणी जात दफनभूमींना भेट असतो. ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक व्यक्तींच्या थडग्यांच्या ठिकाणी जात तेथे तो छायाचित्रे काढून घेतो. वॉशिंग्टन डीसीमध्ये जॉन एफ. केनेडी आणि लॉस एंजिलिसमध्ये मर्लिन मुन्रोच्या दफनभूमीलाही त्याने भेट दिली आहे. मार्कने आतायर्पंत 700 दफनभूमींना भेट दिली असून यातील 100 युनायटेड किंग्डममधील आहेत. खेळ, राजकारण, चित्रपट आणि इतिहासाशी निगडित लोकांच्या थडग्यांना भेट देणे त्याला आवडते. स्वतःच्या या अजब छंदापोटी त्याने आतापर्यंत 1 कोटी 24 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च केली आहे.
वाईट अनुभवही.. पेशाने नर्स असणाऱया मार्कला लोकांना दफन करण्यात आलेल्या ठिकाणांना शोधताना अनेक मजेशीर घटनांना तोंड द्यावे लागले आहे. रुझवेल्ट यांच्या दफनभूमी येथे पोहोचले असताना ते एका थडग्यात कोसळून तेथे अनेक तास अडकून पडले होते. अनेक प्रयत्नानंतर त्यांना तेथून बाहेर पडले होते. हा त्यांचा भीतीदायक अनुभव होता.