A hotelier lost Rs.1 lakh due to a mistake
वीज वितरण कंपनीचे बिल थकीत असल्याचे सांगून ते भरण्यासाठी ऑनलाईन माहिती देणाऱ्या ग्राहकाच्या खात्यातून तब्बल १ लाख ५ हजार रुपये काढल्याचा धक्कादायक प्रकार सावंतवाडीनजीक माजगाव येथे गुरुवारी घडला. आपले बिल थकीत असल्याचे सांगून एका हॉटेल व्यावसायिकाला क्विक सपोर्ट नावाचे अँप डाउनलोड करण्यास सांगन्याय आले. त्याने अँप डाउनलोड करून त्यात माहिती भरली. त्यानंतर तब्बल सातवेळा त्याच्या बँक खात्यातून थोडे थोडे असे मिळून १ लाख ५ हजार ७७३ रुपये कट झाल्याचा मेसेज आला. रक्कम हडप झाल्याचे समजतात तात्काळ त्यांनी सावंतवाडी पोलीस स्टेशनला व बँक शाखेशी संपर्क साधत माहिती दिली. तसेच सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे.
सावंतवाडी / प्रतिनिधी