A huge program at Nirvade on the occasion of Satam Maharaj’s death anniversary
साटम महाराज कला क्रिडा सेवा मंडळाच्या वतीने निरवडे झरबाजार येथे गुरुवार ९ ते ११ मार्च रोजी तुकाराम बीज तिथी साटम महाराज यांची ८६ वी पुण्यतिथी निमित्त विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .गुरुवार ९ मार्च रोजी सकाळी ८ वाजता मूर्तिपूजन व पादुका पूजन , दुपारी १२ वाजता आरती , दुपारी १२. ३० वाजता तिर्थप्रसाद , दुपारी १.३० वाजता महाप्रसाद , सांयकाळी ६ वाजता हरिपाठ व आरती , रात्री ७ वाजता बुवा रुपेंद्र परब ( वडखोल ) बुवा सुंदर मेस्री ( कलाल ) बुवा चिन्मय सावंत ( कणकवली ) या भजना बुवांचा जुगलबंदी कार्यक्रम , शुक्रवार १० मार्च रोजी सांयकाळी ६ वाजता महिला मंडळ निरवडे यांचा हरिपाठ व आरती , सायंकाळी ८ वाजता ( सिंधुदुर्ग गोवा राज्य ) येथील खुली रेकॅार्ड डान्स स्पर्धा प्रथम पारितोषिक ७०२३ व आकर्षक चषक , व्दितीय पारितोषिक ५०२३ व आकर्षक चषक , शनिवार ११ रोजी सायंकाळी ४ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम , सायंकाळी ६ वाजता हरिपाठ व आरती , रात्री ८ वाजता लिलाव , रात्री ९ वाजता नामवंत कलाकार यांचा संयुक्त दशावतार ‘ वीर बब्रुवाहन ‘ हा नाट्यप्रयोग होणार आहे . तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन साटम महाराज कला क्रिडा सेवा मंडळाने केले आहे .
न्हावेली / प्रतिनिधी