Tarun Bharat

उ. कोरियाने डागली आणखी दोन क्षेपणास्त्रे

Advertisements

सोल / वृत्तसंस्था

उत्तर कोरियाने शनिवारी सकाळी पुन्हा एकदा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली. दक्षिण कोरियाच्या लष्कराने ही माहिती दिली आहे. उत्तर कोरियाने प्योंगयांगच्या सुनान भागातून पूर्व समुद्रात दोन क्षेपणास्त्रे डागली आहेत, असे एका निवेदनात म्हटले आहे. आठवडाभरातील ही चौथी क्षेपणास्त्र चाचणी आहे. जपानी लष्करानेही याला दुजोरा दिला आहे.

दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्यात जवळीक निर्माण होत असल्याने उत्तर कोरियाकडून वारंवार क्षेपणास्त्रांची चाचणी केली जात आहे. यापूर्वी 25 सप्टेंबर, 28-29 सप्टेंबर रोजी प्रत्येकी एक क्षेपणास्त्र डागण्यात आले होते. अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया यांच्या संयुक्त लष्करी सराव आणि अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्या भेटीनंतर ही चाचणी करण्यात आली आहे.  अलीकडे उत्तर आणि दक्षिण कोरियामधील तणाव वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हॅरिस यांच्या दक्षिण कोरिया दौऱयानंतर दोनदा क्षेपणास्त्रे डागण्यात आली. कोरियाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या कायद्याचे उल्लंघन केले आहे. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढत आहे. कमला हॅरिस 28 सप्टेंबर रोजी दक्षिण कोरियाची राजधानी सोल येथे पोहोचल्या होत्या.

Related Stories

जम्मूत एकवटले काँग्रेसमधील ‘जी-23’ नेते

Amit Kulkarni

बिगर विमा क्षेत्रातून प्रीमियममधून 17 हजार कोटी प्राप्त

Patil_p

रुपयाचा नवा नीचांक

Patil_p

चहा कामगारांच्या वेतनात आसाम सरकारकडून वाढ

Patil_p

हेमंत सोरेन यांचा मोठा दिलासा

Patil_p

अमित खरे पंतप्रधान मोदींचे नवे सल्लागार

Patil_p
error: Content is protected !!