Tarun Bharat

काळय़ादिनी मोठय़ा संख्येने महिला उपस्थित राहणार

महिला आघाडी बैठकीत ठराव : रिंगरोडसाठी सुपीक जमिनीचे संपादन नको

प्रतिनिधी / बेळगाव

मागील 66 वर्षांपासून म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली मराठी भाषिकांचा लढा नि÷sने सुरू आहे. 1 नोव्हेंबर रोजी संपूर्ण सीमाभागात निषेध फेरी काढून मराठी भाषिक आपला निषेध व्यक्त करतात. 1 नोव्हेंबर रोजी निघणाऱया सायकल फेरीमध्ये मोठय़ा संख्येने महिला सहभागी होतील, असा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीच्यावतीने बैठकीत करण्यात आला.

शनिवार खूट येथील महिला आघाडीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये रिंगरोड तसेच काळादिन विषयी चर्चा करण्यात आली. रिंगरोडसाठी शेतकऱयांच्या सुपीक जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार असून, रिंगरोडसाठी सुपीक जमिनी संपादित करू नयेत, असा ठराव बैठकीत करण्यात आला.

यावेळी महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणु किल्लेकर, सचिव माजी महापौर सरिता पाटील, प्रिया कुडची, अर्चना कावळे, अर्चना देसाई, भाग्यश्री जाधव, कांचन येळ्ळूरकर, सुजाता बामुचे, प्रभावती सांबरेकर, मेघा, राजश्री बांबूळकर, राजश्री बडमंजी, माला जाधव, शामिनी पाटीलसह इतर भगिनी उपस्थित होत्या.

Related Stories

रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामतर्फे गरजू विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्य

Amit Kulkarni

जामीन मिळूनही विनय कुलकर्णींची सुटका नाही

Amit Kulkarni

दिवसभर शांत…सायंकाळी गर्दी

Patil_p

साखळी अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी

Amit Kulkarni

मांसविक्री दुकानांतील कचऱयापासून बनणार मत्स्यखाद्य

Amit Kulkarni

पशुसंगोपन सुरू करणार गो-शाळा

Amit Kulkarni