प्रतिनिधी/ सोलापूर
वन्यप्राणी विषयक गुह्यास प्रतिबंध घालण्यासाठी वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी वापरण्यात येणारे वागार, ट्रप व जाळी तयार करणाऱ्या लोकांची माहिती गोळा करून यादी तयार केली जाणार असल्याची माहिती ग्रामीण पोलीस दलाने दिली. दरम्यान, पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली व्याघ्र कक्ष (टायगर सेल) ची स्थापना करण्यात आली आहे.
वन्यप्राण्याची शिकार कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये वन्यप्राण्यांची शिकार करणाऱयांची माहिती पोलीस आणि वन विभागाकडून गोपनीयरीत्या काढण्यात येणार आहे. अशा प्रकारचे वागार, जाळी व टॅप असणारे लोकांची पोलीस ठाणे निहाय माहिती तयार करून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत असून असे साहित्य मिळून आल्यास त्यांच्यावर वन्यजीव अधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी कोणी इसम तयारी करत असेल किंवा कोणी विक्री करीत असेल तर अशा इसमांची माहिती मोबाईल नंबर 9823127172 किंवा 1026 या टोल फ्री क्रमांकावर कळवण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.