Tarun Bharat

थोडेसे कतार फुटबॉल वर्ल्डकपविषयी…!

Advertisements

फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला आता पाच-एक महिन्यांचा कालावधी बाकी राहिला असून त्याचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. यंदा 21 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत कतारमध्ये होत असलेल्या फुटबॉलच्या या सर्वोच्च व्यासपीठाची क्रीडा शौकिनांना बरीच उत्सुकता आहे. दोनच दिवसांपूर्वी आयोजकांनी यंदा 23 ऐवजी 26 खेळाडूंना परवानगी असेल, असे जाहीर करत सहभागी संघांना दिलासा दिला. मात्र, कतारला यजमानपद जाहीर झाले, त्यावेळेपासून काही वादविवादांनी देखील या स्पर्धेला चांगलेच घेरले आहे. स्पर्धेबद्दल एकंदरीत पार्श्वभूमी कशी असेल, त्याचा हा छोटासा लेखाजोखा…!

कतार वर्ल्डकपबद्दल वाद का?

फिफा फुटबॉल वर्ल्डकपचे यजमानपद मिळावे, यासाठी निवडणूक होते आणि ते यजमानपद आपल्यालाच मिळावे, यासाठी कतारने मतदान करणाऱया देशांना भलीमोठी लाच दिली, असा आरोप प्रारंभापासून होत आला आहे. भरीत भर म्हणून वर्ल्डकपसाठी आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चरची उभारणी करताना 6500 पेक्षा अधिक कामगारांचा बळी गेला. शिवाय, कामगारांचे शोषण केले जात असल्याचेही गंभीर आरोप झाले आहेत.

कतारमधील नेमके निर्बंध कोणते?

कतार हा इस्लामी देश आहे आणि तेथे आयातीचे कठोर नियम आहेत. कतारमध्ये जाणाऱया प्रवाशांना अल्कोहोल, ड्रग्ज, पोर्नोग्राफी, गैर-इस्लामी धार्मिक पुस्तके घेऊन जाण्याची परवानगी नाही. अगदी ई-सिगारेटना देखील तेथे बंदी आहे.

असा असतो ड्रेस कोड

कतारमध्ये महिलांच्या ड्रेसबद्दल विशेष बंधने आहेत. त्यामुळे, स्टेडियम्समध्ये येणाऱया महिला चाहत्यांना अगदी स्लीव्हलेस ड्रेसही परिधान करता येणार नाहीत. सार्वजनिक ठिकाणी लाँग स्कर्ट किंवा ट्राऊजर सक्तीचे असेल. इतकेच नव्हे तर अगदी पुरुष चाहत्यांना देखील सार्वजनिक ठिकाणी शॉर्ट्स घालून फिरता येणार नाही.

अल्कोहोलवर देखील काटेकोर निर्बंध

कतारमध्ये मद्यावर बंदी नाही. पण, याबाबत मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. तेथे चाहत्यांना फक्त लायसन्स असलेल्या रेस्टॉरन्ट्समध्ये मद्यपान करता येईल. मद्यपानासाठी किमान वय 21 असेल. मद्याविषयी तरतुदीचा भंग केल्यास 64 हजार रुपयांचा दंड किंवा 6 महिने कारावास अशा शिक्षेची तरतूद आहे.

असे असतील कोरोनाचे नियम

वर्ल्डकपसाठी कतारमध्ये जाऊ इच्छिणाऱया चाहत्यांना ‘टॅक अँड ट्रेस’ हा ऍप डाऊनलोड करावा लागेल. शिवाय, कतारमध्ये पोहोचण्यापूर्वी 48 तासाआधीचा निगेटिव्ह रिपोर्ट सादर करावा लागेल. याशिवाय, पूर्ण लसीकरणाचा दाखला देखील द्यावा लागणार आहे.

कतार वर्ल्डकपसाठी 32 पात्र संघ

संघ / फेडरेशन / वर्ल्डकपमधील मागील कामगिरी

कतार / एएफसी / यंदा पदार्पण

जर्मनी / युफा / साखळी फेरी

डेन्मार्क / युफा / उपउपांत्यपूर्व फेरी

ब्राझील / कोन्मेबॉल / उपांत्यपूर्व फेरी

फ्रान्स / युफा / चॅम्पियन्स

बेल्जियम / युफा / तिसरे स्थान

क्रोएशिया / युफा / उपविजेते

स्पेन / युफा / उपउपांत्यपूर्व फेरी

सर्बिया / युफा / साखळी फेरी

इंग्लंड / युफा / चौथे स्थान

स्वित्झर्लंड / युफा / उपउपांत्यपूर्व फेरी

नेदरलँड्स / युफा / पात्रता नाही

अर्जेन्टिना / कॉन्मेबॉल / उपउपांत्यपूर्व फेरी

इराण / एएफसी / साखळी फेरी

दक्षिण कोरिया / एएफसी / साखळी फेरी

जपान / एएफसी / उपउपांत्यपूर्व फेरी

सौदी अरेबिया / एएफसी / साखळी फेरी

इक्युडोर / कॉन्मेबॉल / पात्रता नाही

उरुग्वे / कॉन्मेबॉल / उपांत्यपूर्व फेरी

कॅनडा / कोन्सासेफ / साखळी फेरी (1986)

घाना / सीएएफ / साखळी फेरी (2014)

सेनेगल / सीएएफ / साखळी फेरी

पोर्तुगाल / युफा / उपउपांत्यपूर्व फेरी

पोलंड / युफा / साखळी फेरी

टय़ुनिशिया / सीएएफ / साखळी फेरी

मोरोक्को / सीएएफ / साखळी फेरी

कॅमेरुन / सीएएफ / साखळी फेरी (2014)

मेक्सिको / कोन्सासेफ / उपउपांत्यपूर्व फेरी

अमेरिका / कोन्सासेफ / उपउपांत्यपूर्व फेरी (2014)

ऑस्ट्रेलिया / एएफसी / साखळी फेरी

वेल्स / युफा / उपांत्यपूर्व फेरी (1958)

कोस्टारिका / कोन्सासेफ / उपांत्यपूर्व फेरी (2014)

फुटबॉल फेडरेशन्सची यादी (कंसात सदस्य राष्ट्र)

युफा ः युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन्स (55)

कॉन्मेबॉल ः कॉन्फडरेशन सुदाअमेरिकाना डे फुटबॉल (10)

कोन्सासेफ ः कॉन्फडरेशन ऑफ नॉर्थ, सेन्ट्रल अमेरिकन, कॅरेबियन असोसिएशन (41)

सीएएफ ः कॉन्फडरेशन आफ्रिकन डे फुटबॉल (54+2 असोसिएट)

एएफसी ः आशियाई फुटबॉल फेडरेशन (47)

Related Stories

किचन कॅबिनेट!

Omkar B

ऍश्ले बार्टी यंदाची ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम सम्राज्ञी

Patil_p

मियामी स्पर्धेत मरेला वाईल्डकार्डद्वारे प्रवेश

Patil_p

‘टेस्ट स्पेशालिस्ट’ खेळवत ऑस्ट्रेलिया ‘टी-20 वर्ल्ड चॅम्पियन्स’!

Patil_p

टी-20 वर्ल्ड कप दर दोन वर्षांनी होणार

Patil_p

श्रीकांत, सात्विक-अश्विनी उपांत्यपूर्व फेरीत, सायना पराभूत

Amit Kulkarni
error: Content is protected !!