प्रवासी किरकोळ जखमी
न्हावेली / वार्ताहर
सावंतवाडी – रेडी राज्य मार्गावरील मळगाव घाटीत सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसला घाटातून खाली येणाऱ्या लक्झरी बसने समोरासमोर धडक दिली.या अपघातात एसटीतील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले.मात्र, सुदैवाने एसटी बस दरीलगत असलेल्या रेलिंग लगत थांबल्याने मोठा अनर्थ टळला . या एसटीत महाविद्यालयात जाणारे अनेक विद्यार्थी होते अपघातानंतर मळगावच्या दिशेने आलेल्या बसला तेथेच थांबवण्यात आले.याबाबत पोलिस तक्रार करणार असल्याची माहिती यावेळी एसटी प्रशासनाने दिली आहे.याबाबतची माहिती मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर यांनी दिली आहे.