A man has been jailed for seven years for a knife attack with intent to kill
उसने घेतलेले पैसे परत देत नसल्याचा राग आल्याने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी रमेश शांताराम दळवी 65 रा. वेंगुर्ला होडावडा याला दोषी धरून जिल्हा न्यायाधीश 1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती सानिका जोशी यांनी त्याला सात वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी काम पाहिले.
होडावडा येथील लक्ष्मण दळवी यांच्यावर 24 एप्रिल 2016 रोजी ठार मारण्याच्या उद्देशाने चाकू हल्ला झाला होता. याप्रकरणी रमेश दळवी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रतिनिधी / ओरोस