कासेगाव/वार्ताहर
वाळवा तालुक्यातील कासेगाव येथे मज्जिद युसुफ आत्तार (वय ६० रा. कासेगाव ता. वाळवा जि. सांगली) यांचा अज्ञाताने डोक्यात दगड घालून खून केला असून बबलु मज्जिद आत्तार यांनी याबाबत कासेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत कासेगाव पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की, दि. २१ रोजी रात्री १० च्या दरम्यान मयत मज्जिद युसुफ आत्तार यांच्या डोक्यात कोणीतरी अज्ञातानी, अज्ञात कारणावरुन सिमेंट क्रॉंन्किटचा दगड घालून गंभीर जखमी करुन त्याचा खुन केला. त्यांचा मृतदेह कासेगाव ते वाटेगाव जाणाऱ्या रोडच्या उत्तरेस असलेल्या राजारामबापु साखर कारखान्याच्या गट ऑफीसच्या गेट समोर आढळून आला असून अज्ञाताविरुध्द भा.द.स. 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास स. पो. नि. अविनाश मते करीत आहेत.
हे ही वाचा : साप चावल्याने धुंदवडे पैकी चौधरवाडी येथील युवकाचा मृत्यू