52 टक्के पालकांचे मत
खेळणी केवळ मुलांच्या मनोरंजनासाठी नसतात. खेळणी शिक्षकाप्रमाणे मुलांना शिकवितात आणि समजवितात देखील. या तंत्रज्ञानाच्या युगात 7 वर्षांपर्यंतच्या मुलांना शिक्षण याच खेळण्यांमधून मिळत आहे. एका मुलाकडे सरासरी 26 खेळणी असतात. तरीही लहान मूल दर आठवडय़ाला पालकांकडून नवी खेळणी मागत असते. निम्म्याहून अधिक पालकांना मुलांच्या नजीक ठेवता येईल अशा प्रकारची खेळणी हवी असतात असा खुलासा एका सर्वेक्षणातून झाला आहे.
सर्वेक्षणानुसार बाजारपेठेत अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानांवर आधारित सोशल इमोशनल लर्निंग, बोलणे आणि अन्य संस्कृतीच्या हिशेबानुसार खेळणी उपब्लध आहेत, परंतु मुलांची स्मरणशक्ती वाढविणाऱया खेळण्यांना अधिक प्राधान्य देण्यात येत आहे.
सर्वेक्षणानुसार 68 टक्के आईवडिल स्वतःच्या मुलांच्या आवडीनुसार खेळणी पसंत करतात. सुमारे तीन-चतुर्थांश पालक सद्यकाळातील खेळणी तांत्रिक स्वरुपात अत्यंत विकसित असल्याचे मान्य करतात. याचमुळे 58 टक्के पालक अशा खेळणींचा शोध घेतात, जी त्यांच्या मुलांचे वय आणि विचार करण्याच्या पद्धतींसाठी उपयुक्त आहेत.
72 टक्के पालक 14 किंवा त्याहून कमी वयाच्या मुलांसोबत खेळू इच्छितात. द टॉय असोसिएशनचे कार्यकारी उपाध्यक्ष एड्रियन एपेल यांच्यानुसार खेळणी मुलांच्या भावनांवर संतुलन राखणे आणि स्वीकृतीला चालना देणे तसेच विविध संस्कृतींचा आनंद प्राप्त करण्यास मदत करतात.
मुलांना सर्वाधिक खेळणी त्यांचे आजीआजोबा मिळवून देत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. 38 टक्के आजी-आजोबा विविध प्रकारची, संस्कृती आणि जीवनशैलीवर आधारित खेळणी देत असतात. तर सद्यकाळात 28 टक्के खेळणी पर्यावरणस्नेही आणि याच थीमवर आधारित असतात.