Tarun Bharat

बासरी वादनाने श्रोत्यांची संध्याकाळ स्मरणीय

Advertisements

गोकुळाष्टमीच्या पूर्वसंध्येला कार्यक्रम

प्रतिनिधी /बेळगाव

बेळगावचे सुपुत्र व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बासरी वादक राजेंद्र कुलकर्णी यांच्या सुरेल बासरी वादनाने रसिक श्रोत्यांची संध्याकाळ स्मरणीय केली. आयएमईआरच्या सभागृहात बुधवारी सायंकाळी पंडित राजेंद्र कुलकर्णी यांचे बासरी वादन झाले. गोकुळाष्टमीच्या पूर्वसंध्येला झालेले हे बासरी वादन मोठे औचित्यपूर्ण ठरले.

श्रीधर कुलकर्णी यांनी कलाकारांचा परिचय करून दिला. सर्व कलाकारांचा सत्कार लता कित्तूर यांनी केला. राजेंद्र यांनी सुरुवातीला श्रोत्यांशी संवाद साधला आणि बेळगावातील आपल्या जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा देऊन पुढे बासरी वादनाला सुरुवात केली.

सुरुवातीला त्यांनी राग गावती सादर केला. गावती रागातील विलंबित गत झुमरा तालात आणि द्रुतगत तीनतालात त्यांनी सादर केली. त्यानंतर त्यांनी राग हमीर मधील एक गत द्रुत एकतालात सादर केले. राग मिश्र पिलू मधील एक रचना त्यांनी मध्यंतरापूर्वी सादर केली.

मध्यंतरानंतर राजेंद्र यांनी राग जोग आणि रागेश्री यांचे मिश्रण असलेला राग जोगेश्वरी सादर केला. मध्य लय गत झपतालात बांधलेली होती आणि द्रुत गत तीनतालात. पं. पन्नालाल घोषांची भैरवीतील एक रचना वाजवून त्यांनी आपल्या कार्यक्रमाची सांगता केली.

error: Content is protected !!