Tarun Bharat

बाल्टिक समुद्रात फुटला ‘मिथेन बॉम्ब’

Advertisements

नॉर्ड स्ट्रीम गळतीमुळे युरोपमध्ये खळबळ

वृत्तसंस्था/ बर्लिन

बाल्टिक समुद्रात नैसर्गिक वायू पाइपलाइन ‘नॉर्ड स्ट्रीम’ला नुकसान पोहोचले आहे. यामुळे दर तासाला सुमारे 23 हजार किलो मिथेन वायूची गळती होत आहे. ही वायूगळती एक गंभीर संकटात रुपांतरित होत आहे. उत्तर युरोपमध्ये बाल्टिक समुद्र जवळपास सर्वच दिशांनी भूवेष्टित आहे. या वायूगळतीमुळे युरोपमध्ये खळबळ उडाली आहे. तर वायूगळती थांबल्याचे डेन्मार्क सरकारकडून रविवारी सांगण्यात आले आहे.

ही गॅस पाइपलाइन बाल्टिक समुद्रात 100 मीटर खोल आहे. 26 सप्टेंबर रोजी गॅस पाइपलाइनचे नुकसान झाले होते, ज्यानंतर आतापर्यंत यात अनेक स्फोट झाले आहेत. नॉर्ड स्ट्रीम पाइपलाइनमधील स्फोट आणि त्यामुळे होणारी वायूगळती बाल्टिक समुद्रातील जैवव्यवस्था नष्ट करू शकते अशी भीती व्यक्त होत आहे. या पाइपलाइनमधील स्फोटासाठी रशिया जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. युरोपीय देशांमधील इंधन पुरवठा विस्कळीत करण्यासाठी रशियाने पाइपलाइनमध्ये स्फोट घडवून आणल्याचा आरोप आहे.

नॉर्ड स्ट्रीम पाइपलाइनमधून दर तासाला 22,920 किलो वायूची गळती होत आहे. हे प्रमाण 2 लाख 85 हजार किलो कोळसा जाळण्याइतके आहे. मिथेन वायूला जागतिक तापमानवाढीसाठी जबाबदार मानले जाते.

नॉर्ड स्ट्रीम पाइपलाइनचा स्फोट अनेक टीएटी बॉम्बस्फोटांसमान आहे. पाइपलाइन लवकर दुरुस्त न केल्यास मोठय़ा संख्येत जीव-जंतूंना नुकसान पोहोचणार आहे. तसेच सागरी परिवहनही प्रभावित होऊ शकते असे संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रमाने म्हटले आहे.

Related Stories

कुलभूषण जाधव यांना उच्च न्यायालयात अपील करता येणार

datta jadhav

युद्धामुळे रखडणार भारताचे संरक्षण क्यवहार

Patil_p

पाकिस्तान गिलगिट, बाल्टीस्तानची स्वायत्तता रद्द करणार

datta jadhav

नव्व्यान्नव वर्षाच्या माजी लष्करी अधिकाऱ्याने जमवले 20 कोटी

prashant_c

श्रीलंकेकडून भारताला मोठा झटका

Patil_p

अमेरिकेत मोनोक्लॉनल अँटीबॉडी थेरपीला मान्यता

datta jadhav
error: Content is protected !!