तालुका प्रतिनिधी/मोहोळ
आठवड्य़ाला 10 टक्के व्याजाने एक वर्षापूर्वी 20 हजार रुपये घेतले. त्याच्या बदल्यात एक लाख रुपये देऊनही आणखी पैशाची मागणी सुरू होती. ती न दिल्यास तुझ्याकडून घेतलेल्या कोऱया धनादेशवर पाच लाखांची रक्कम टाकून केस करण्याची धमकी दिली, चाकूने वार करून गंभीर जखमी केले आणि खिशातील एक हजार रुपये रोख आणि चार ग्रॅम सोन्याची अंगठी काढून घेतली म्हणून पोलीस ठाण्यात त्या खासगी सावकारी करणाऱ्या सुदर्शन गायकवाड याच्या विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश दिलीप गायकवाड (वय 30, रा. गायकवाड वस्ती, मोहोळ) यांचा रोपवाटिका व शेतमाल व्यापारचा धंदा आहे. त्यांना आर्थिक अडचण निर्माण झाली होती म्हणून त्यांनी सुदर्शन सुभाष गायकवाड यांच्याकडून 20 हजार रुपये आठवडय़ाला 10 टक्के व्याज अशा दराने अंदाजे एक वर्षापूर्वी घेतले होते. या रकमेपोटी एक लाख रुपये देऊनही सुदर्शन गायकवाड हा व्याजासह जादा पैशाची मागणी करत होता अन्यथा तुझ्या विरोधात माझ्याकडे असलेल्या तुझ्या कोरा धनादेशवर पाच लाख रुपयांची रक्कम टाकून स्टॅम्पवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करेन अशी वारंवार धमकी देत होता. महेश गायकवाड यांच्या खात्याला शेतकऱयांच्या शेतमालाची मोठी रक्कम येत होती हे त्याला माहीत होते. या खात्यावर धनादेश जमा करून ती रक्कम काढून घेण्याची तो धमकी वारंवार देत होता. गुरुवारी संध्याकाळी साडेनऊच्या सुमारास पुणे रस्त्यावरील बंद असलेल्या छत्रपती हॉटेलजवळ सुदर्शन गायकवाड, समाधान गायकवाड त्या ठिकाणी आले.
त्यांच्याकडे व्याजाचे एक लाख रुपयांच्या रकमेची मागणी ते करू लागले. तुझे सर्व व्याज दामदुप्पट दराने परत दिले आहे, आता माझे काहीही देणे शिल्लक नाही असे सांगितल्यावर सुदर्शन याने धक्काबुक्की केली व खिशातील मोठय़ा आकाराचा सुरा दाखवून धमकी देऊन एक हजार रुपये आणि बोटातील चार ग्रॅमची सोन्याची अंगठी काढून घेतली. राहिलेले पैसे कधी देतो ते सांग नाहीतर तुझा जीव घेतो असे बोलून डोक्मयावर वार करण्याचा प्रयत्न केला. पण तो वार महेश गायकवाड यांनी चुकविला आणि त्यावेळेसच डाव्या हाताने वार आडवला. डाव्या हाताला मोठी जखम झालीच. पुन्हा त्याने पोटात सुरा खुपसला. तो ही डाव्या हाताने अडवला. त्यावेळी डाव्या हाताला मोठी जखम होऊन भरपूर प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. बाजूला माणसे असतानाही सुदर्शनच्या दहशतीमुळे कोणी मध्ये पडले नाही. वाचवा वाचवा असे ओरडल्याने सुदर्शन यास समाधान घेऊन गेला. त्यानंतर महेश दिलीप गायकवाड यास मोहोळ पोलीस ठाण्यात खबर नेवून प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून प्राथमिक उपचार करून सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. याबाबत सुदर्शन गायकवाड याच्याविरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.