Tarun Bharat

नगराध्यक्ष घनश्याम शिरोडकरांवरील अविश्वास ठराव 15-0 ने संमत

बैठकीला घनश्याम यांच्यासह 10 नगरसेवकांची अनुपस्थिती

प्रतिनिधी /मडगांव

मडगावचे नगराध्यक्ष घनश्याम शिरोडकर यांच्यावर आणलेला अविश्वास ठराव शुक्रवारी 15-0 अशा फरकाने संमत करण्यात आला. यावेळी घनश्याम शिरोडकर यांच्यासह दहा नगरसेवक अनुपस्थित राहिले. अविश्वास ठरावाला सामोरे जाण्याच्या अगोदरच त्यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आठवडा देखील पूर्ण होण्याआधीच पद सोडावे लागलेले मडगाव पालिकेचे ते पहिले नगराध्यक्ष ठरले होते.

मडगाव पालिका 25 सदस्यांची असून बहुमतासाठी ?13 नगरसेवकांचे पाठबळ अ?ावश्यक आहे. गोवा फॉरवर्डचे 8, भाजपातून गोवा फॉरवर्ड गटाकडे आलेल्या एक नगसेविका आणि नगराध्यक्ष घनश्याम शिरोडकर असे 10 जणांचे संख्याबळ सत्ताधारी गटाकडे होते. भाजपकडे एकूण 15 नगरसेवक असून यातील पाच जण फुटल्याने घनश्याम यांचे फावले होते आणि त्यांनी मडगावचे आमदार दिगंबर कामत-भाजप गटाचे उमेदवार दामोदर शिरोडकर यांचा नगराध्यक्ष निवडणुकीत 15-10 मतांनी पराभव केला होता. त्यामुळे भाजप, आमदार कामत व या निवडणुकीत लक्ष घातलेले मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाही धक्का बसल होता. त्यानंतर भाजप नगरसेवकांना ताबडतोब पणजीत बोलावून त्यांच्या अविश्वास ठरावावर सहय़ा घेण्यात आल्या होत्या तसेच त्यांना जांबावलीतील संस्थानात नेऊन देव दामोदरासमोर प्रमाणही करून घेण्यात आले होते.

घनश्याम शिरोडकर यांना खुर्ची सांभाळण्यासाठी किमान तीन नगरसेवकांची गरज होती. मात्र हात उंचावून अविश्वास ठरावावर मतदान होत असल्याने पुन्हा मते फुटणे जवळजवळ अशक्यप्रायच असल्याचे स्पष्ट झाले होते. अशा परिस्थितीत शिरोडकर यांनी एक दिवस आधीच राजीनामा दिला होता. त्यांनी पद सोडले, तरी शुक्रवारी अविश्वास ठराव दाखल केलेल्या नगरसेवकांनी नियमानुसार ठरावावर मतदान करून त्यांची अधिकृतरीत्या उचलबांगडी केली.

Related Stories

मुलांमधील गुणकौशल्यांना वाव देणारे शिक्षण हवे

Patil_p

कला अकादमीचे आजपासून नुतनीकरण

Amit Kulkarni

गोमंतकीय पत्रकारांचा चाणक्य पुरस्काराने सन्मान

Amit Kulkarni

डिचोली नगरपालिकेची प्रभाग संख्या वाढण्याची शक्यता ?

Patil_p

मुरगावांत भाजपाविरोधी 1400 मते मतदार यादीतून गाळण्याचे प्रयत्न

Patil_p

तार नदीवरील पूल 30 मे पर्यंत खुला

Amit Kulkarni