वंशाच्या दिव्यासाठी ठराविक दवाखान्यात होणारी गर्दी संशयास्पद
यंत्रणेपुढे आव्हान
कोल्हापूर/संतोष पाटील
नकोशीला जगात येण्यापूर्वीच नाहीशी करण्यासाठी पुरोगामी म्हणवणाया कोल्हापुरातही अजब फंडे वापरले जात आहेत. सहज हालविता येणारे पोर्टेबल सोनोग्राफी मशिन व्हॅनमध्ये बसवून स्त्रीबीज हत्येची सेवा घर पोहच सुरू आहे. दवाखान्यात व व्हॅनमधून फिरती अशी 40 हून अधिक सोनोग्राफी केंद्र जिह्यात कार्यरत आहेत. यासह शहरपरिसरासह जिह्यातील अनेक सामान्य दर्जाच्या दवाखान्यात वंशाच्या दिव्यासाठी होणारी गर्दी संशयास्पद आहे. कायद्याच्या कचाटय़ात सहिसलामत सुटून चालणाया किल द बेबी गर्ल सर्व्हीस सेंटरला चाप लावण्याचे आव्हान यंत्रणेपुढे आहे.
कोल्हापुरात लेक वाचवा आंदोलन झाली. समाजसेवी संस्थांनी प्रबोधनाचा जागर केला. जोडीला सायलेन्ट ब्जर्व्हर यंत्रणा आली. प्रशासकीय यंत्रणेने कारवाईचा बडगा उगारला. यानंतर काही अंशी चाप बसला. कालातरांने यंत्रणा ढिली पडली. स्त्रीभ्रुण हत्येसाठी थाटलेल्या दुकानदारांनी नवीन फंडे आणले आहेत. वंशाला दिवा पाहिजे ही वाढलेली मानसिकता आणि त्यासाठी भरमसाठ मोल घेवून उपलब्ध असणारी यंत्रणा अशी दुतर्फी गरज असल्यानेच हा गोरखधंदा राजरोसपणे सुरु आहे. कोल्हापूर जिह्यात सुमारे 400 अधिकृत सोनोग्राफी सेंटर आहेत. तर 40 हूनअधिक सोनोग्राफी मशिन्स् बेकायदेशीर असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.
कसबा बावडा, कागल, कर्नाटक सिमावर्ती भाग, इस्लामपूर, करवीर तालुक्यातील पश्चिम भागातील काही गावांत राजरोजपणे गर्भलिंग चाचणी केली जाते. नोंदणीकृत सोनोग्राफी मशिन दिखाव्यासाठी ठेवून अवैध मार्गाने देशात आणलेली (अॅस्मेलब्ड) व सायलेन्ट ऑब्जव्हर न बसविलेली सोनोग्राफी मशिनवर गर्भलिंग चाचण्या केल्या जातात. या पारंपारिक पळवाटेला आता अत्याधुनिक यंत्रणेची जोड दिली जात आहे. टुथब्रश व लॅपटॉपच्या आकाराचे पोर्टेबल अल्ट्रासाऊंड मशिन्स व यंत्रणा व्हॅनमध्ये ठेवून घरात किंवा सुरक्षित स्थळी येवून गर्भलिंग चाचणी केली जाते. चाचणीत मुलगी असल्याचे सिध्द झाल्यास घरीच गर्भपाताचे सोपस्कार पूर्ण करणारी यंत्रणा सध्या कोल्हापुरात पुन्हा सक्रिय झाली आहे. शहरातील काही दवाखान्यात सकाळपासून भली मोठी रांग असते. हमखास मुलगा होणार अशी खात्री येथे दिली जाते. पहिली मुलगी झालेल्या झोडप्यांची अधिक असते. पहिली प्रसुती याच दवाखान्यात झालेल्या जोडप्यांना येथे प्राधान्यक्रम दिला जातो. भ्रुण हत्याकेंद्राची माहिती घेवून कायद्याच्या चौकटीत शिक्षा करण्याचे धाडस यंत्रणा दाखविणार काय हा खरा सवाल आहे.
सोनोग्राफी चाचण्या धोकादायक
भारतात 1980 च्या दरम्यान लिंग चाचणीसाठी सोनोग्राफी मशिनचा वापर सुरू झाला. मुलगी असल्यास गर्भपातासाठी अशा चाचण्याचा उपयोग केला जात असल्याचे पुढे आल्यानंतर प्रसूतीपूर्व व गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा (पीसीपीएनडीटी-1994) 1994 साली संमत झाला व 1996 पासून प्रत्यक्ष अमंल सुरु झाला. हाच कायदा 2004 अधिक कडक करुन गैरवापराबाबत शिक्षेची तरदुत करण्यात आली. मुलींचे प्रमाण चिंताजनक स्थितीच्या खाली गेल्यानंतर गर्भलिंग चाचणी व त्यांनतरची शस्त्रक्रियेबाबत अधिक कडक धोरण अवलंबिले. सोनोग्राफी मशिन्सचा वापर कोणी करावा व कसा करावा, रुग्णाच्या शरिरात सोडण्यात येणाया लहरी किती क्षमतेच्या असाव्यात याचे निकष ठरले आहेत. गर्भाची वैद्यकिय स्थिती जाणून घेण्यासाठी सोनोग्राफीचा वापर करण्याचे निर्देष आहेत. प्रत्यक्षात वंशाचा दिव्याचा हठ्ठाहास व काही डॉक्टरांची दुकानदारी त्यामुळे लिंग चाचणीसाठी आरोग्यास दिर्घकालीन घातक ठरणाया लहरी शरीरात सोडल्या जातात. मेंदू, रक्त पुरवठा करणाया सुक्ष्म वाहिन्या, किडनी, ह्रद्य आदींवर विपरित परिणाम होत असल्याचे अनेक अभ्यास अहवालातून पुढे आले आहे.
मानसिकता बदलण्याची गरज
स्त्री भ्रुण हत्या रोखण्यासाठी सर्व सोनोग्राफी केंद्रांना सायलंट ऑब्जर्व्हर बसवून कोणत्या सोनोग्राफी केंद्रात काय प्रकार चाललाय हे स्पष्ट होण्यास मदत होते. तसेच सोनोग्राफी करताना त्या महिलेकडून ऑनलाईन अर्ज भरुन घेतला जातो.कायद्याच्या पळवाटांच्या आधारास घरातूनच वंशाचा दिवा हवा पाहिजे म्हणून होणारा हट्टाची साथ मिळत असल्यानेच स्त्रीभ्रुण हत्या वाढत आहेत. हे थांबवायचे असेल तर त्याची सुरुवात घरातूनच व्हायला हवी. जोपर्यंत मुलगाच हवा ही मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत हा प्रकार कमी होणार नाही. यासाठी फक्त यात जोडलेल्या डॉक्टरर्स व यंत्रणेला दुषणं देवून उपयोग नाही.
असा चालतो गोरखधंदा
हमखास मुलगाच होणार किंवा नको असलेली मुलगी गर्भातच नष्ट करण्याची सेवा देणाया केंद्रांची माहिती शासकीय यंत्रणे व्यतिरिक्त सहज उपलब्ध आहे. मुलगाच होण्याची खात्री देत शहराच्या उपनगरातील काही दवाखान्यांनी 15 ते 30 हजार रुपयाचे तोंडी पॅकेजच दिले जाते. याचाचणीसाठी 15 हजारांची डिपॉझिट घेवून चाचणीत मुलगी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अर्धी भरलेली परत देण्याची हमी दिली जाते. मात्र, नको असलेला गर्भपात करण्यासाठी 25 हजारांपर्यंत शुल्क आकारले जाते. वंशाच्या दिव्यासाठी सुरु असलेल्या या खेळात गर्भवतीचा जीव जाण्याचा धोका असूनही तो सहज पत्करला जात आहे.