Tarun Bharat

हवामानाच्या सुधारित अंदाजासाठी नवी प्रणाली

पुणे / प्रतिनिधी :

A new system for improved weather forecasting जगभरात हवामानाच्या अंदाजासाठी 12 किलोमीटरचे मूलभूत एकक (रिझोल्यूशन) वापरण्यात येते. परंतु, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या नैसर्गिक आपत्ती पाहता त्याहीपेक्षा कमी परिसरासाठी अंदाज वर्तविणे गरजेचे झाले आहे. यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी प्रथमच सहा किलोमीटरची हाय रिझोल्यूशन जागतिक हवामान अंदाज प्रणाली (एचजीएफएम) विकसित केली असून, तिचे अनावरण भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) हीरकमहोत्सवी वर्धापनदिन कार्यक्रमात करण्यात आले.

कार्यक्रमाला केंद्रीय पृथ्वीविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन, वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा. आर. एन. केशवमूर्ती, प्रा.जगदीश शुक्ला, आयआयटीएमचे संचालक डॉ. आर. कृष्णन, सीएसआयआरचे माजी संचालक डॉ. शेखर मांडे आदी उपस्थित होते. प्रणालीच्या अंतिम टप्प्यातील चाचण्या सुरू असून, लवकरच ती प्रत्यक्ष वापरात येईल, असा विश्वास डॉ. रविचंद्रन यांनी व्यक्त केला. तसेच या वेळी पावसाळय़ातील विजांच्या दुर्घटनेची माहिती देणाऱया दामिनी ॲपचे अद्ययावत संस्करणही लाँच करण्यात आले.

अधिक वाचा : उच्च न्यायालयाने मंदाकिनी खडसेंची याचिका फेटाळली

या वेळी बोलताना डॉ. रविचंद्रन म्हणाले, हवामान अंदाज वर्तविण्याच्या क्षेत्रात भारताला अजूनही सुधारणा करण्याची गरज आहे. देशातील हवामान अंदाज चांगले येत असले, तरी अजूनही सुधारण्यास भरपूर वाव आहे. ढगांच्या भौतिक आणि रसायनशास्त्राबरोबरच हवामानातील अंतर्गत बदल आणि ध्रुवीय बदलांचाही मॉन्सूनवर होणारा परिणाम अभ्यासावा लागणार आहे. त्यामुळे आपण अधिक अचूक अंदाज वर्तवू शकतो. मागील साठ वर्षातील आयआयटीएमच्या प्रवासाचा लेखाजोखा डॉ. आर. कृष्णन यांनी मांडला.

नव्या प्रणालीची वैशिष्टय़े :

  • सहा किलोमीटरसाठीही हवामानाचा अंदाज वर्तविणे शक्य होईल
  • हवामान अंदाजाची अचूकता अधिक वाढले
  • अगदी छोटय़ा परिसरातील हवामान बदल टिपता येईल
  • अतिवृष्टी, चक्रीवादळे आदी आपत्तींचा अधिक अचूक अंदाज वर्तविला येईल

दामिनी ॲपचे नवे व्हर्जन :

  • 14 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध
  • विजांच्या कडकडाटावेळी अलर्ट आणि खबरदारीचे उपाय
  • नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश मिळणार
  • पुश मेसेज या नव्या सुविधेमुळे 20 किलोमीटर परिसरातील अलर्ट मिळणार

पुढील मान्सूनपर्यंत नवी प्रणाली कार्यान्वित : डॉ. एम. रविचंदन

नवीन हवामान अंदाज प्रणालीची या मॉन्सूनमध्ये चाचणी घेण्यात आली असून, मिळालेल्या निष्कर्षांचे विश्लेषण करण्यात येत आहे. त्या आधारावर पुढील निर्णय घेण्यात येईल. स्थानिक स्तरावर पाच दिवसांचा अंदाज वर्तविण्यासाठी ही प्रणाली निश्चितच उपयोगी ठरेल. पुढील मॉन्सूनपर्यंत ही प्रणाली कार्यान्वित होईल, असा विश्वास वाटतो.

Related Stories

संघ कधीही सत्ताकारणात येणार नाही; मोहन भागवतांनी स्पष्टचं सांगितलं

Abhijeet Khandekar

Ratnagiri : मुंबईतील व्यापारी खून प्रकरण- सीसीटिव्ही फुटेज पोलिसांच्या हाती

Abhijeet Khandekar

सोलापुरात आज नव्या 21 कोरोनाबाधित रुग्णांची भर, रुग्णांची संख्या 456 वर

Archana Banage

राज्यात दोन महिन्यात उष्माघाताचे 25 बळी

datta jadhav

साताऱयात सायकल चोरी करणारी टोळी जेरबंद

Patil_p

१७ वर्षीय रमेशबाबू प्रज्ञानंदने केले जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला पराभूत

Rahul Gadkar
error: Content is protected !!