Tarun Bharat

चीनमध्ये मिळाला नवा विषाणू

Advertisements

झोनोटिक लँग्याचे 35 रुग्ण

वृत्तसंस्था/ बीजिंग

कोरोना संकट अद्याप पूर्णपणे संपलेले नसताना चीनमध्ये आणखी एक विषाणू आढळून आला आहे. तैवान सेंटर फॉर डिसिज कंट्रोलनुसार चीनमध्ये झोनोटिक लँग्या विषाणू आढळला असून याद्वारे सुमारे 35 जण संक्रमित झाले आहेत. तैवान या विषाणूची ओळख पटविण्यासाठी संक्रमणावर देखरेख ठेवण्यासाठी न्यूक्लिक ऍसिड टेस्टिंग मेथड सुरू करणार आहे.

लँग्या हेनिपाव्हायरस चीनच्या शेंडोंग आणि हेनान प्रांतांमध्ये आढळून आला आहे. हा विषाणू प्राण्यांपासून माणसांमध्ये फैलावतो. विषाणूत मानवातून मानवी संक्रमण होत नसल्याचे अध्ययनात दिसून आले आहे. परंतु हा विषाणू माणसातून माणसात फैलावू शकत नाही हे अद्याप म्हणता येत नाही. विषाणूबद्दल अधिक माहिती समोर येईपर्यंत सतर्कता बाळगणे गरजेचे असल्याचे उद्गार तैवानच्या सीडीसीचे उपमहासंचालक चुआंग जेन-हिसियांग यांनी काढले आहेत.

प्राळीव प्राण्यांवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात बकऱयांमध्ये 2 टक्के तर श्वानांमध्ये 5 टक्के संक्रमण आढळून आले आहे. 25 वन्यप्राण्यांवर झालेल्या परीक्षणत उंदरासारखा दिसणारा एक प्राणी लँग्या विषाणू फैलावण्याचे मुख्य कारण ठरू शकतो असा निष्कर्ष प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.

न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये प्रसिद्ध ‘ए जूनोटिक हेनिपाव्हायरस इन फेब्राइल पेशंट्स इन चायना’ या अहवालात चीनमध्ये नव्या हेनिपाव्हायरसची ओळख पटविण्यात आल्याचे म्हटले गेले आहे. चीनच्या शेडोंग आणि हेनान प्रांतांमध्ये लँग्या विषाणूने संक्रमित 35 रुग्ण सापडले आहेत. चीनमध्ये 35 रुग्णांचा परस्परांशी कुठलाच संपर्क आढळून आलेला नाही. तसेच रुग्णांचे कुटुंबीय आणि निकटवर्तीयांमध्ये कुणीच संक्रमित झालेले नाही. 35 पैकी 26 रुग्णांमध्ये ताप, थकवा, खोकला, भूक हरपणे, स्नायूदुखी, डोकेदुखी आणि उलटी होणे यासारखी लक्षणे दिसून आली आहेत. रुग्णांमध्ये पांढऱया पेशींमध्ये घट होत असल्याचे आढळून आले आहे. याचबरोबर रुग्णांमध्ये लिव्हर अन् किडनी फेल्युयर यासारखी लक्षणे दिसल्याचे चुआंग यांनी सांगितले.

Related Stories

इटली निर्बंध शिथिल

Patil_p

श्रीलंकेतून हजारो शरणार्थी येण्याची शक्यता

Patil_p

अफगाणिस्तानात आत्मघातकी हल्ला; 8 ठार

datta jadhav

केवळ चिप्स अन् बर्गर खाणारी युवती

Patil_p

लडाखच्या देमचुकमध्ये चिनी सैनिकांची आगळीक

Patil_p

काबूलमधील ड्रोन हल्ला ही भयंकर चूक

Patil_p
error: Content is protected !!