प्रतिनिधी / बेळगाव
गुरुवारी बेळगाव तालुक्मयात कोरोनाचा एक नवा रुग्ण आढळून आला आहे. बेळगाव वगळता इतर कोणत्याही तालुक्मयात नवे रुग्ण आढळून आले नाहीत. अद्याप 11 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 1 लाख 1 हजार 795 वर पोहोचली आहे. यापैकी 1 लाख 778 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 22 लाख 6 हजार 642 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 20 लाख 98 हजार 328 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्याप 1 हजार 52 जणांचा अहवाल यायचा आहे.