अध्ययनात चकित करणारा खुलासा
माणूस स्वतःच्या प्रकृतीची देखभाल करण्यासाठी चांगला आहार अन् आजारी पडल्यास औषधांचे सेवन करतो. परंतु माणसाची तंदुरुस्ती पृथ्वीवर असलेल्या अन्य जीवजंतूंच्या प्रकृतीवरही निर्भर असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. बेडकांच आरोग्य आणि त्यांचे अस्तित्व देखील याच्याशी जोडलेले आहे. बेडकांचे अस्तित्व कशाप्रकारे माणसासाठी लाभदायक आहे हे एका अध्ययनात दिसून आले आहे.
सातत्याने कमी होतेय संख्या
बेडुक हा एक उभयचर प्राणी आहे. माणसांच्या आरोग्यात त्याचे महत्त्वाचे योगदान आहे. सायन्स अलर्टच्या एका अहवालानुसार बेडुक पृथ्वीवर कमी झाल्यास माणसांच्या आरोग्यावर प्रतिकुल प्रभाव पडणार आहे. 80 च्या दशकाच्या कोस्टा रिका आणि पनामामध्ये बेडकांसमवेत अनेक उभयचर जीवांची संख्या विशेषकरून बेडुक आणि सॅलामँडर कमी होत असल्याचे वैज्ञानिकांना आढळून आले होते.
मच्छरजनित आजार
आशिया आणि दक्षिण अमेरिकेत उभयचर प्राण्यांच्या 501 प्रजाती विलुप्त झाल्या आहेत. या प्राण्यांचे अस्तित्व संपल्याने जगभरात फंगस वेगाने फैलावत आहे. तसेच मच्छर तसेच मच्छरांनी फैलावणारे आजारही वाढत आहेत. बेडुक आणि सॅलामँडर्स हे मच्छरांची संख्या संपविण्यास मदत करत असतात. डास हेच त्यांचे मुख्य भोजन असते.
अध्ययन प्रकाशित
जगात जेव्हा कुठल्याही भागात बेडकासारख्या उभयचर प्राण्यांच्या संख्येत घट होते, तेव्हा त्या भागात मलेरियासारखे आजार डोकं वर काढू लागतात. यासंबंधीचे अध्ययन एनव्हॉयरन्मेंट रिसर्च लेटर्समध्ये प्रकाशित झाले आहे. व्हायरल फंगल पॅथोजनपासून मलेरियाला रोखणारे बेडुक आणि सॅलामँडर्स यासारख्या प्राण्यांचे अस्तित्व संकटात आहे. पृथ्वीवर असलेले जीवजंत कुठल्या न कुठल्या प्रकारे पर्यावरणीय व्यवस्थेचे संतुलन राखण्यात योगदान देत असतात. यात असंतुलन निर्माण झाल्यास मानवी प्रकृतीवर प्रभाव पडतो. पृथ्वीवरील जवळपास सर्व प्रजातींशी माणसांच्या संवेदनशील संबंधांवर वैज्ञानिक नजर ठेवून आहेत.