A person from Sawantwadi arrested in Kolhapur liquor operation–
गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या टेम्पो वर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर भरारी पथकाने कारवाई केली. सदरची कारवाई सोमवारी भोगावती ता करवीर जिल्हा कोल्हापूर येथे केली. बेकायदा दारू वाहतुक केल्याप्रकरणी नितीश रमेश तांबोसकर (वय 33रा चराठा ता सावंतवाडी) यास अटक करण्यात आले. यात 36लाख 69 हजार रुपयांच्या दारुसह 10 लाख रुपयांचा टेम्पो (एम एच46 एआर 0313)असा एकूण 46 लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. जिल्ह्याच्या प्रत्येक सीमेवर एवढी कडक तपासणी असतानाही हा एवढा मोठी दारू भरलेली गाडी कोल्हापूर जिल्ह्यात पोहचली कशी याचा तपास होणे गरजेचे आहे.
सदरची कारवाई निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर या पथकाने मा. विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर बी. एच. तडवी व निरीक्षक . एस. जे. डेरे यांचे आदेशाने दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे, कॉन्स्टेबल सर्वश्री पवार, संदिप जानकर, शंकर मोरे, दिपक कापसे, योगेश शेलार यांनी केली पुढील तपास दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, कोल्हापूर हे करीत आहेत.
बांदा/ प्रतिनिधी