नदीपात्रात शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू
रामनगरः
दांडेली काळी नदी येथे मगरीचा वावर वाढला आहे. शनिवारी दांडेली येथील तीन नंबर गेट येथे मासे पकडण्यासाठी गेलेल्या सुरेश तेली नामक व्यक्तीला मगरीने पायाला पकडून नदीत ओढून नेले. सुरेशच्या ओरडण्याच्या आवाजाने नागरिकांनी धाव घेतली असता मगरीने त्याला ओढून नेत असल्याचे यावेळी प्रत्यक्ष पाहिले.
दांडेली येथे यापूर्वीही नदीकाठी गेलेल्या व्यक्तींना मगरीने पाण्यात ओढून नेऊन ठार केल्याच्या घटना घडल्या आहेत. घटनेची माहिती कळताच पोलीस तसेच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. नदीपात्रात शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.