Tarun Bharat

10 वर्षीय मुलाच्या चित्राला कोटय़वधींची किंमत

Advertisements

कमी वयातच मुलाने केले 2.50 कोटी दान

मराठीत ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ अशी म्हण आहे. ही म्हण खरी करून दाखविली आहे एका मुलाने. या मुलाला वयाच्या चौथ्या वर्षीच चित्रकलेचा छंद जडला आणि त्याने इंटरनेटद्वारे मोठमोठय़ा चित्रकारांना फॉलो करण्यास सुरुवात केली. वयाच्या 10 व्या वर्षापर्यंत त्याने काढलेल्या चित्रांना कोटय़वधींची किंमत मिळू लागली आहे.

अमेरिकेत राहणाऱया 10 वर्षीय मुलाने एक अशी चित्रे काढली आहेत जी माठेमोठय़ा सेलिब्रिटींनी सुमारे 2 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली आहेत. आंद्रेस वेलेंसियाला वयाच्या चौथ्या वर्षीच चित्रकलेच छंद जडला होता. या छंदाच्या जोपासनेकरता त्याला आईवडिलांचा पाठिंबा मिळाला आणि तो करोडपती चित्रकार झाला आहे. आता त्याच्या चित्रांना प्रसिद्ध कलादालनांमध्ये प्रदर्शित केले जात आहे.

लिटिल पिकासो

चौथीत शिकणाऱयात आंद्रेस वेलेंसियाला आता लिटिल पिकासो असे म्हटले जात आहे. वेलेंसियाने काढलेल्या चित्रांना आता ख्यातनाम कलादालनांकडून स्थान देण्यात येत असून ही चित्रे पाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटी पोहोचत असतात. आंद्रेसच्या चित्रांना मोठी पसंती मिळत आहे. वेलेंसियाचे एक चित्र हाँगकाँगमध्ये फिलिप्स डे प्यूरीमध्ये 1.3 कोटी रुपयांमध्ये विकले गेले. तर इटलीत त्याचे एक चित्र 1.88 कोटी रुपयांमध्ये विकले गेले आहे. वयाच्या केवळ 10 व्या वर्षातच आंद्रेस अनेक प्रसिद्ध कलादालानांच्या लोकप्रिय कलाकारांमध्ये सामील झाला आहे. त्याची वाढती लोकप्रियता आणि गुणवत्ता याचमुळे त्याच्या कलेविषयी अनेक जगप्रसिद्ध प्रसारमाध्यमांमध्ये लेख छापून आले आहेत. आंदेसने स्वतःच्या कमाईतील सुमारे 2 कोटी रुपये एका एड्स ट्रस्टला दान केले आहेत.

होतेय कौतुक

आंद्रेस वयाच्या चौथ्या वर्षी त्याच्या वडिलांचे क्लाएंट असलेले कलाकार रेटिना यांच्या चित्रांना कॉपी करायचा. हे पाहून त्याच्या आईवडिलांनी त्याला कलाकृतींसाठी प्रोत्साहित केले. चेस नावाच्या व्यक्तीने आंद्रेसच्या प्रतिभेला प्लॅटफॉर्म उपलब्ध करण्याची सूचना केली होती. ज्यानंतर चेसने आर्ट मियामीचे प्रसिद्ध संचालक निक कॉर्निलॉफ यांच्यासमोर आंद्रेसचा उल्लेख केला होता. प्रारंभी सर्वजण साशंक होते. परंतु नंतर वयाचा उल्लेख न करता आंद्रेसच्या चित्रांना कलादालनात स्थान देण्यात आले आणि मोठमोठय़ा सेलिब्रिटींनी त्याच्या चित्रांचे कौतुक केले आणि काही जणांनी चित्रांची खरेदी केली. ही चित्रे 10 वर्षीय मुलाने काढल्याचे त्यांना कळल्यावर ते अवाप् झ्ा़ाले होते.

Related Stories

जगातील सर्वात उंच श्वान

Patil_p

‘गुरु-शनि’ महायुतीचा आज दिसणार नजारा

Patil_p

वास्तुशास्त्र आणि खिडकी, दरवाजे

tarunbharat

2 ड्रिंक्स एकाचवेळी पिण्यासाठी अनोखी शक्कल

Patil_p

जगातील सर्वात महाग कलिंगड

Patil_p

भाजी विकता विकता झाला आयएएस

Patil_p
error: Content is protected !!