Tarun Bharat

करमळी येथे घरावर पिंपळाचे झाड कोसळले

Advertisements

सुदैवाने जीवितहानी टळली, घराची हानी

कुंभारजुवे/प्रतिनिधी

 करमळी सकयलेभाट येथील मेघनाथ आणि दत्ता मुरगांवकर यांच्या घरांवर रविवारी पहाटे पिपळाचे झाड कोसळल्याने मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

  कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी  परिस्थितीची पाहणी करुन नुकसानीचा आढावा घेतला. जुने गोवे अग्निशामक दलाचे आणि आपत्कालीन विभागाचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाल. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने छतावर पडलेल्या पिंपळाच्या मोठय़ा फांद्या साफ करण्यास सुरुवात केली.

  या पडलेल्या झाडाच्या मोठय़ा फांद्यांमुळे घराच्या छताचे नुकसान झाले. अनेक मंगलोर कौले फुटली आणि वासेही मोडले. झाड विद्युत तारांवरती पडल्याने तारा तुटल्या. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. आमदार फळदेसाई यांनी घरमालकांना दुरुस्तीसाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

जॉन बोर्जेस यांच्यासह करमळी पंचायतीचे माजी सरपंच कुष्टा सालेलकर व अन्य याप्रसंगी उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत असून, झाडे उन्मळून पडण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

Related Stories

युवा काँग्रेसने रस्त्यांवरील खड्डय़ांत पेटविल्या मेणबत्त्या

Amit Kulkarni

लोकायुक्तांचा आदेश हायकोर्टात रद्दबातल

Patil_p

मडगावातील भिकारी, बेघर परप्रांतीय बनले धोक्याची घंटा

Patil_p

उत्पादनातील सर्वेसर्वा ‘ग्लोबल’ सिस्टम्स्

Amit Kulkarni

भाजपमध्ये होत होती प्रचंड घुसमट

Amit Kulkarni

डॉ. दिलीप वेर्णेकर अनंतात विलीन

Amit Kulkarni
error: Content is protected !!