108 प्रवासी बालंबाल बचावले
लिमा / वृत्तसंस्था
पेरुची राजधानी लिमा विमानतळावर मोठी दुर्घटना टळली. धावपट्टीवर अग्निशमन दलाच्या ट्रकला विमानाची धडक बसल्याने दोघांचा मृत्यू झाला. अपघातानंतर विमानाला आग लागली, मात्र सुदैवाने विमानातील प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. तथापि, या अपघातात ट्रकमधील दोन अग्निशमन जवानांचा मृत्यू झाला. या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
एलएटीएएम एअरलाईन्सचे विमान लिमाच्या जॉर्ज चावेझ आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना समोरून एक ट्रक धावपट्टीच्या दिशेने येत होता. विमान जवळ येताच ट्रक चालकाने थांबण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. विमानाने ट्रकला धडक देत पुढे चाल सुरू ठेवली. यात विमानाचा एक पंख ट्रकला आदळल्याने आग लागली. याप्रसंगी विमानात 102 प्रवासी आणि 6 विमान कर्मचारी असे एकंदर 108 जण उपस्थित होते. सुदैवाने संपूर्ण विमानाला आग न लागल्याने सर्व प्रवासी सुखरुप राहिल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. अपघातानंतर विमानतळाचे सर्व कामकाज काही काळासाठी स्थगित करण्यात आले होते. या अपघातात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही, असे विमानतळावरील एका अधिकाऱयाने सांगितले.