Tarun Bharat

पोलिसांच्या वाहनात स्फोटाचा कट उधळला

Advertisements

अमृतसरमध्ये बॉम्ब ठेवताना दोघे सीसीटीव्हीत कैद ः संशयितांचा शोध सुरू

अमृतसर / वृत्तसंस्था

पंजाब पोलिसांनी अमृतसरमध्ये बॉम्बस्फोटाचा कट उधळून लावला. पोलीस निरीक्षक दिलबाग सिंग यांच्या कारखाली बॉम्ब ठेवतानाची घटना उघड झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून याला दुजोरा मिळाला असून पोलिसांनी बॉम्ब हस्तगत व निकामी करत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सीसीटीव्हीचे फुटेज प्रसारमाध्यमांच्या हाती लागले असून त्यात संशयित हल्लेखोर दुचाकीवरून आल्याचे दिसून येत आहे. पोलिसांच्या पार्क केलेल्या वाहनाभोवतील दोन फेऱया मारल्यानंतर त्यांनी गाडीखाली स्फोटकजन्य वस्तू ठेवली होती. त्यानंतर ते पसार झाले असून सीसीटीव्हीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला जात आहे. संशयित तपास यंत्रणांच्या हाती लागल्यास या घटनेत नेमका कोणते अधिकारी निशाण्यावर होते, यासंबंधीचा उलगडा होऊ शकतो.

पंजाबमध्ये गेल्या काही दिवसात दहशतवादाशी संबंधित कुरापती वाढल्याचे दिसून येत आहे. 14 ऑगस्ट रोजी पंजाब पोलिसांनी नवी दिल्लीतून चार दहशतवाद्यांना अटक केली होती. या चौघांकडून पोलिसांनी आयईडीशिवाय तीन ग्रेनेड, दोन पिस्तूल आणि 40 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. 15 ऑगस्ट रोजी दिल्लीत बॉम्बस्फोट घडवण्याची त्यांची योजना होती, असा दावा पंजाब पोलिसांनी केला आहे.

Related Stories

‘टीव्ही अँकर’वरून 2 राज्यांचे पोलीस आमने-सामने

Patil_p

शोपियां चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान

datta jadhav

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेश सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Rohan_P

गोवा, उत्तराखंडमधील प्रचारतोफा थंडावल्या

Patil_p

बस-ट्रकच्या धडकेत 10 जणांचा मृत्यू

Patil_p

उत्तराखंड : गेल्या 24 तासात 416 नवे कोरोना रुग्ण; तर आतापर्यंत 143 मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!