वृत्तसंस्था/ बुसेल्स
बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका पोलीस अधिकाऱयाचा मृत्यू झाला आहे. या पोलीस अधिकाऱयावर चाकू हल्ला करण्यात आला होता. पोलिसांनी चाकू हल्ला करणाऱया दहशतवाद्यावर गोळय़ा झाडल्या होत्या. जखमी दहशतवाद्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यामागील उद्देश जाणून घेण्याच्या दृष्टीने तपास केला जात आहे. हल्ल्यापूर्वी दोन्ही पोलीस अधिकारी संबंधित भागात गस्त घालत होते. हल्ल्यानंतर पोलिसांचे अन्य पथक तेथे पोहोचल्यावर हल्लेखोरावर नियंत्रण मिळविण्यात आल्याची माहिती पोलीस विभागाचे प्रवक्ते एरिक वान डय़ूसे यांनी दिली आहे.