Tarun Bharat

खानदेशातील लोकप्रिय डान्सर जोडप्याला पुणे पोलिसांनी केली अटक

Advertisements

पुणे / वार्ताहर :

A popular dancer couple from Khandesh was arrested by the Pune police गाजलेल्या गाण्यांवर नाच करणाऱ्या ‘डान्सर’ जोडप्याला पुणे पोलिसांनी सुरतमधून अटक केली आहे. यू टय़ूबवर या जोडप्याचे फॅन फॉलोवर्स जबरदस्त असून, त्यांनी फिल्म बनविण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने पुण्यात येऊन एक बोगस फायनान्स कंपनी उघडून त्याद्वारे शंभरहून अधिक नागरिकांना गंडा घातला आहे. स्वारगेट पोलिसांनी या पसार झालेल्या जोडप्याला बेडय़ा ठोकल्या आहेत.

दिपाली जितेंद्र पौनिकर (वय 32) आणि हेमराज जिवनलाल भावसार (वय 28) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. दिपाली व हेमराज हे लिव्हइनमध्ये राहतात. मुळचे ते खानदेशातील आहेत. त्यांचा यू टय़ूब व इन्स्टाग्रामवर मोठा फॅन फॉलोवर आहे. दरम्यान, त्यांनी अनेक गाजलेल्या गाण्यांवर डान्स देखील केलेला आहे. त्यांना एक फिल्म बनवायची होती. त्यासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे त्यांनी फसवणुकीचा मार्ग पत्कारला, अशी माहिती स्वारगेट पोलिसांकडून देण्यात आली आहे.

अधिक वाचा : गांधी घराण्यातील कोणीही काँग्रेसचा अध्यक्ष होणार नाही

दोघांनी स्वारगेटमधील मुकुंदनगर भागात एक मानधन मायक्रो फायनान्स कंपनी सुरू केली. त्यामाध्यमातून येणाऱया नागरिकांना तत्काळ कर्ज देऊ असे सांगितले. एक लाखांच्या कर्जासाठी आधी दहा हजार रुपये द्यावे लागतील, अशी बतावणी त्यांनी केली. त्यानंतर प्रत्येक येणाऱ्याकडून कर्ज देण्याच्या बहाण्याने पैसे उकळले. त्यांनी जवळपास शंभर पेक्षा अधिक नागरिकांना फसविले आहे. आतापर्यंत त्यांनी 28 जणांकडून 12 लाख 30 हजार रुपये घेतल्याचे समोर आले आहे. या नागरिकांकडून पैसे घेऊन दोघे फायनान्स कंपनीला कुलूप लावून पसार झाले होते. याप्रकरणी दोघांचा शोध घेण्यात येत होता. यावेळी स्वारगेट पोलिसांना ते गुजरातमध्ये असल्याचे समजले. त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक अशोक इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अशोक येवले, पथकातील तारू, शेख, गायकवाड, महिला अंमलदार होळकर व त्यांच्या पथकाने सुरतमध्ये छापेमारीकरून त्यांना पकडले. दोघेही एका एसआरए इमारतीत भाडय़ाने खोली घेऊन राहत होते. तेथून त्यांना पकडले आहे.खानदेशात या दोघांची जबरदस्त लोकप्रियता आहे. त्यांचे फॉलोवर्स देखील मोठे आहेत. त्यांच्या या फसवणूक प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, त्यांनी वेगवेगळय़ा गाण्यांवर डान्स देखील केले आहेत. ही कारवाई परिमंडळ दोनचे उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Related Stories

इचलकरंजीत बीअर बारवर छापा ; मालकासह दोघांना अटक

Abhijeet Shinde

संभाजीराजेंना काँग्रेसचा पाठिंबा होता, नाना पाटोलेंनी ‘मविआ’ला दिले हे उत्तर

Abhijeet Shinde

महाराष्ट्राचा एकही नेता पंतप्रधान का नाही?; नितीन गडकरी म्हणाले…

Abhijeet Shinde

महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयांमध्ये शिवराज्याभिषेक दिन ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा होणार

Rohan_P

पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात हवामान विभागानं दिला अतिवृष्टीचा इशारा

Abhijeet Shinde

‘शिवसेनेचा मला जीवे मारण्याचा कट’, सोमय्यांकडून नवा व्हिडिओ व्हायरल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!