Tarun Bharat

रोहन पाटीलचे दमदार शतक

Advertisements

वृत्तसंस्था/ म्हैसूर

येथे सुरू असलेल्या पहिल्या केएससीए महाराजा चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत गुलबर्गा मिस्टीक्स संघाकडून खेळणाऱया रोहन पाटीलने दमदार नाबाद शतक झळकविले. या स्पर्धेत शतक झळकविणारा 20 वर्षीय रोहन पाटील हा पहिला फलंदाज आहे. इंग्लंडमधील टी-20 स्पर्धा द हंड्रेडस् क्रिकेट स्पर्धेत 20 वर्षीय विल स्मिड हा पहिला शतकवीर बनला तर भारतातील महाराजा चषक स्पर्धेत रोहन पाटील हा पहिला शतकवीर बनला आहे.

म्हैसूरच्या वडियार मैदानावर गुलबर्गा मिस्टीक्स आणि म्हैसूर वॉरियर्स यांच्यात झालेल्या सामन्यात रोहन पाटीलच्या दमदार शतकाने गुलबर्गा मिस्टीक्सने म्हैसूर वॉरियर्सचा 9 गडय़ांनी पराभव केला. करुण नायरच्या नेतृत्वाखाली म्हैसूर वॉरियर्सने 19 षटकात 4 बाद 160 धावा जमविल्या. त्यानंतर गुलबर्गा मिस्टीक्स संघाच्या डावाला दमदार प्रारंभ झाला. रोहन पाटीलने केवळ 15 चेंडूत आपले अर्धशतक तर 42 चेंडूत शतक झळकविले. त्याने 47 चेंडूत 7 षटकार आणि 11 चौकारासह नाबाद 112 धावा झोडपल्या. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे पंच आनंद पाटील यांचा रोहन मुलगा आहे. हुबळी टायगर्स विरुद्धच्या यापूर्वी झालेल्या सामन्यात म्हैसूर वॉरियर्स संघातर्फे कर्णधार नायरने 91 धावा झोडपल्या होत्या.

महाराजा चषक केएससीए टी-20 क्रिकेट स्पर्धा 7 ऑगस्टपासून म्हैसूरमध्ये सुरू झाली आहे. या स्पर्धेतील पहिल्या टप्प्यातील सामने म्हैसूरच्या वडियार मैदानावर खेळविले जात आहेत. म्हैसूरमध्ये एकूण 18 सामने होणार असून त्यानंतर अंतिम सामन्यासह 16 सामने बेंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहेत.

Related Stories

‘वन-लेग स्टान्स’वर जिंकले वेटलिफ्ंटगचे सुवर्ण!

Patil_p

गोलंदाजी करत नसेल तर हार्दिक वनडे, टी-20 साठीही पात्र नाही!

Patil_p

ऑलिंपिकसाठी भारतीय मुष्टीयोद्ध्यांची संख्या वाढण्याची शक्यता कमी

Patil_p

फख्र झमान न्यूझीलंड दौऱयातून बाहेर

Omkar B

बायर्न म्युनिचला मोसमातील दुसरे जेतेपद

Patil_p

बॅलोन ओडोर शर्यतीतून मेस्सी बाहेर

Patil_p
error: Content is protected !!