भगवान गणाचे 1 हजार वर्षे जुने मंदिर
देशात अनेक गणेश मंदिरं आहेत, परंतु काही मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी मोठय़ा रांगेत उभे रहावे लागते. देशातील काही मंदिरं ही घनदाट जंगलात आहेत. असेच एक भगवान गणेशाचे मंदिर घनदाट जंगलातील उंच पर्वतावर आहे. काही ठराविक लोकच या मंदिरापर्यंत पोहोचून गणेशाचे दर्शन घेऊ शकतात. तर मंदिराची देखभाल करणारा पुजारी मात्र या उंच पर्वतावर चढून दररोज पूजा करत असतो. घनदाट जंगलातील उंच पर्वतावर असलेल्या या छोटय़ा गणेश मंदिराचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हे गणेश मंदिर छत्तीसगडच्या ढोलकल पर्वतावर असल्याचे समजते. हे मंदिर पाहण्यासाठी शेकडो पर्यटक येत असतात. परंतु येथील पुजारी दररोज प्रचंड मेहनत करून पूजा करत असतो. छत्तीसगडच्या ढोलकल पर्वतावरील या गणेश मंदिराचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे.
गणेश मंदिर समुद्रसपाटीपासून 300 फुटांच्या उंचीवर आहे. हे मंदिर 1 हजार वर्षे जुने असल्याचे मानले जाते. हे मंदिर बैलाडीला पर्वतरांगेतील घनदाट जंगलात आहे. 9 व्या किंवा 10 व्या शतकात नागवंशी राजघराण्याच्या काळात ‘ढोला’च्या आकारातील पर्वतरांगेवर गणेशाची मूर्ती तयार करण्यात आली होती. या मंदिरायर्पंत केवळ पायी प्रवास करतच पोहोचता येते. गणेश मंदिराच्या व्हिडिओला आतापर्यंत 4 लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या असून लाखो ह्यूज प्राप्त झाले आहेत.