पोलीस हवालदार जखमी
बेळगाव : कारने थांबलेल्या पोलिसांच्या होयसळ वाहनाला धडक दिल्यामुळे पोलीस हवालदार जखमी झाला. गुरुवारी सायंकाळी टिळकवाडी येथील लेले मैदानाजवळ ही घटना घडली असून यासंबंधी वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हणमंत यल्लाप्पा कुद्रेमनी (वय 55) असे जखमी पोलीस हवालदाराचे नाव आहे. स्कोडा कारने पोलीस दलाच्या होयसळ वाहनाला धडक दिल्याने हा अपघात घडला असून अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. जखमी पोलीस हवालदारावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.