2 लाख 10 हजाराचा मुद्देमाल जप्त; सात आरोपी ताब्यात
प्रतिनिधी/ सातारा
सातारा येथील जुना मोटर स्टँड परिसरात जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती स्थानिकाकडून मिळाली. यानंतर चोरगे चव्हाण अपार्टमेंटच्या काळात अवैध फन गेम चालणाया जुगार अड्डय़ावर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकत सात जणांना ताब्यात घेतले. या कारवाईमध्ये प्रिंटर रोख रक्कम, संगणक, इतर साहित्य असा 2 लाख 10 हजार 620 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी अमीर सलीम शेख वय 20 रा. वनवासवाडी ता. सातारा, सतीश शामराव कुहाडे वय 22 नामदेववाडी झोपडपट्टी, सागर अशोक गायकवाड 21 आदर्श सोसायटी मोळाचा ओढा, करण दशरथ घाडगे अंबवडे खुर्द ता. सातारा, शंकर पांडुरंग चिकणे वय 41 रा. चिकणेवाडी ता. सातारा, विलास साईबु पवार वय 23 रा. नामदेववाडी झोपडपट्टी, गाळामालक दिलीप म्हेत्रे रा. सातारा असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संबंधित ठिकाणी अवैध जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बशीर मुल्ला यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली होती. जुना मोटर स्टॅन्ड येथे फन गेम जुगार सुरू असल्याचे पोलिसांना कळाले होते. शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अपार्टमेंटच्या गाळ्यात बुधवारी दुपारी साडेबारा वाजता छापा मारला. त्या ठिकाणी काही जण भिंतीवरील टीव्ही क्रीनवर फिरणाया आकडय़ांवर पैसे लावून जुगार खेळत असल्याचे आढळून आले. याबाबत पोलिसांनी फन गेम चालवणारे इसमासह पाच जणांना ताब्यात घेतले या कारवाईत संगणक, प्रिंटर, रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असे दोन लाख दहा हजार सातशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर गाळ्याबाबत पोलिसांनी चौकशी केली असता गाळामालकाने अवैध जुगार चालवण्यासाठी गाळा उपलब्ध करून देण्याची माहिती प्राप्त झाली असता गाळामालक याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस नाईक स्वप्नील कुंभार यांनी अवैध जुगार चालवणाया व खेळणायांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सदर गुह्याचा तपास पोलीस नाईक ओंकार यादव करत आहेत, अशा प्रकारे कोणी अवैध व्यवसायासाठी गाळा दुकान जागा उपलब्ध करून दिल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल,असा इशारा पोलिसांनी दिला आहे या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, पोलीस उपनिरीक्षक बशीर मुल्ला,हेड कॉन्स्टेबल हसन तडवी, निलेश फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, स्वप्निल सावंत, सचिन पवार यांनी कारवाईत भाग घेतला.