कडेगाव- कराज रोडवर दुर्मिळ उदमांजर मृतावस्थेत आढळले. ही बातमी वनखात्याला कळाल्यावर त्याचा पंचनामा करून अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा मृत्यु झाल्याचे निष्पण्ण झाले.
उदमांजराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने कडेगाव कराड रोडवरील खंबाळे येथील युनिटी बिल्डर जवळ उदमांजर मृतावस्थेत आढळून आले आहे अशी माहीती वनखात्याला मिळाली. रात्री किंवा पहाटे घडलेल्या घटनेची माहीती पर्यावरण प्रेमी डॉ. सुधीर कुंभार यांनी कराड येथील वनविभागाच्या रेंज फॉरेस्ट ऑफिसर रमेश जाधवर यांना कळवली. त्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मृतावस्थेतेतील उदमांजराचा पंचनामा केला. रात्रीच्या वेळी वाहनधारकांनी नियंत्रणाखाली वाहन चालवून पर्यावरणातील प्राणी व पक्षी यांचे रक्षण करावे असे आवाहन पर्यावरण प्रेमी डाँ सुधीर कुंभार यांनी यानिमित्ताने केले आहे.