अमेरिकेतील वाळवंटात विशेष प्रजातीचा उंदीर
जगात उंदराची एक अशी प्रजाती आहे ज्याला जीवनात कधीच पाणी पिण्याची गरज भासत नाही. हा उंदीर वाळवंटात राहतो तरीही कधीच पाणी पित नाही. केवळ झाडांच्या मुळांचे सेवन करून पोट भरतो. या मुळांमध्ये असणारा ओलावाच त्याच्या पाण्याची गरज पूर्ण करते. या उंदराला कांगारू रॅट म्हटले जाते. हा जगातील एकमात्र असा जीव आहे जो पाण्याशिवाय जीवन जगू शकतो.
या प्रजातीचा उंदीर उत्तर अमेरिकेच्या वाळवंटांमध्ये आढळून येतो. याचे पाय आणि शेपटी ऑस्ट्रेलियात आढळून येणाऱया कांगारुशी मिळतीजुळती आहे. याचे गालांच्या बाहेरच्या बाजूने थैली असतात. या थैलींमधून हा उंदीर स्वतःचा आहार बिळांमध्ये आणत असतो. याच्या याच कृत्य आणि शारीरिक थैलीमुळे याला कांगारूप्रमाणे मानले जाते. हा कांगारूप्रमाणेच उडी मारू शकतो. वाळवंटात उगवणाऱया कॅक्टसच्या रोपांना सहजपणे तो उडी मारून ओलांडू शकतो.
कांगारू रॅट वाळवंटी जीवनातील एक खास हिस्सा आहे. हा प्राणी पित नसला तरीही याच्या शरीरात पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने अन्य प्राणी याला खात असतात. हा उंदीर अत्यंत वेगाने पळू शकतो. एका सेकंदात हा उंदीर 6 मीटर अंतर पार करू शकतो. स्वतःच्या शत्रूंपासून वाचण्यासाठी पळताना तो लांब शेपटीचा वापर करत असतो.
याची शेपटी 20 सेंटीमीटर लांबीची असते आणि शरीर सुमारे 18 सेंटीमीटरचे असते, म्हणजेच पूर्ण लांबी सुमारे 38 सेंटीमीटरची असते. याचे पुढील पाय छोटे, डोकं मोठे आणि डोळे लहान असतात. या उंदराच्या शरीरावर पिवळय़ा किंवा करडय़ा रंगाचे केस असतात. वाळवंटात पाण्याची कमी गरज असणारेच प्राणी किंवा वृक्ष तग धरू शकतात. हा उंदीर स्वतःच्या पाण्याची गरज वाळवंटात उगणाऱया क्षांच्या मुळांना खाऊन पूर्ण करतो.