Tarun Bharat

मडगावच्या घाऊक मासळी मार्केटसाठी अखेर आशेचा किरण

13 कोटींची निविदा जारी

प्रतिनिधी /मडगाव

मडगावचे घाऊक मासळी मार्केट म्हटले की, दुर्गंधीचे ठिकाण अशीच ओळख झाली होती. मात्र, या मार्केटचा दर्जा सुधारण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या मार्केटच्या विकासाला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी 13 कोटींची निविदा जारी करण्यात आली आहे.

या मार्केटात मासळी चाचणी प्रयोगशाळा देखील उभारली जाणार आहे. पुढील एका वर्षात गोव्यातील या एकमेव घाऊक मासळी मार्केट नवा सांज चढणार आहे. मच्छीमार खात्याने जीएसआयडीसीमार्फत येथे आधुनिक घाऊक मासळी मार्केट उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रकल्पात कोल्ड स्टोरेज व्यवस्था व मासळी चाचणी प्रयोगशाळेचीही व्यवस्था असेल. गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाने या कामासाठी 13 कोटी रुपयांची निविदा जारी केली आहे.

या घाऊक मासळी मार्केटात स्वच्छता ठेवावी, दुर्गंधी मुक्त मार्केट करावे अशी मागणी गेली कित्येक वर्षापासून केली जात होती. मात्र, या मार्केटकडे सातत्याने दुर्लक्ष झाले होते. आत्ता या मार्केटसाठी आशेचा किरण निर्माण झालेला आहे.

सध्याच्या घाऊक मासळी मार्केटच्या बाजूला असलेल्या जागेत नवी इमारत बांधण्यासाठी 12 जून 2018 रोजी पायाभरणी केली होती. मात्र, गेल्या चार वर्षांत या कामाबद्दल काहीच हालचाल झालेली नाही. मात्र, आता नवी इमारत उभारणीच्या कामाला चालना देण्यात आलेली आहे. या कामासाठी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या 50 कोटी रुपयांचा वापर केला जाईल.

बिट्स पिलानीने सध्याच्या मार्केटमध्ये ‘एफ्लुएंट ट्रिटमेंट प्लांट’ सुरू केले असून त्याचाच उपयोग मार्केटमधील सांडपाणी, कचरा वगैरेची विल्हेवाट लावण्यासाठी केला जाईल. खराब मासळीची विल्हेवाट लावण्यासाठी ‘डायजेस्टर’चीही व्यवस्था केली जाईल.

Related Stories

जागतिक संभाव्य वारसा स्थळांत ‘कातळशिल्पे’

Amit Kulkarni

गोव्यात ऑक्सिजनअभावी आणखी 13 रुग्णांचा मृत्यू

datta jadhav

केरळ ब्लास्टर्स- बेंगलोर एफसी लढत 1-1 अशी बरोबरीत

Amit Kulkarni

बोर्डांने सर्व संबंधितांवर कारवाई करावी : सावईकर

Omkar B

नागेश गोसावी यांचा विर्नोडा येथे सत्कार

Amit Kulkarni

सर्व घटनाकांना समावेश करून घेणारा समावेशी अर्थसंकल्प

Amit Kulkarni