संग्रहात आहेत 3,050 कॅरेक्टर्स
छंद पूर्ण करण्यासाठी लोक काहीही करू शकतात असे बोलले जाते. कधीकधी छंद हेच जीवनाचे उद्दिष्ट ठरते. अशाच एका व्यक्तीने बालपणीच्या छंदापोटी स्वतःचे पूर्ण घर खेळण्यांनी भरून टाकले आहे. या व्यक्तीला खेळण्यांचा नव्हे तर त्याली कॅरेक्टर्सचा छंद आहे.
टेक्सास येथे राहणारे बॅरी इवांसला बालपणी एक व्हिडिओ गेम मिळाला होता, तो त्याला आवडल्याने त्याने व्हिडिओ गेम्समधील कॅरेक्टर्स जमा करून गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केला आहे. सुमारे 30 वर्षांपासून ‘सोनिक द हेजहोग’ या व्हिडिओ गेमची कॅरेक्टर्स तो जमा करत आहे. इवांसच्या संग्रहात सध्या 3,050 कॅरेक्टर टॉय आहेत.
होनिक द हेजहोग 30 वर्षांपासून माझ्या अत्यंत पसंतीची गोष्ट आहे. हा गेम माझ्या संग्रहातील पहिली गोष्ट होती. 1993 मध्ये सोनिक थीमयुक्त बबल गम कंटेनर दुसरी गोष्ट होती. त्यानंतर एक पोस्टर आणि खेळणी दिसलयावर हळूहळू स्वतःच्या खोलीला या कॅरेक्टर्सच्या संग्रहाने सजविण्यास सुरुवात केल्याचे इवांस यांनी सांगितले.
माझ्या संग्रहात काही मूल्यवान गोष्टी आहेत, यात सोनिक आणि त्याची साइडकिक, टेल्सची विशाल मूर्ती यांचा समावेश आहे. अलिकडेच जपानमधून सोनिक आणि टेल्सचा वॉकी-टॉकी मागविला आहे. याचबरोबर सर्वात अनोखी गोष्ट ब्रिटिश बर्गर किंग रेस्टॉरंटसाठी प्लास्टिक सोनिक खेळणी तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा साचा असल्याची माहिती इवांस यांनी दिली.
बॅरी केवळ या खेळण्यांची खरेदी करत नाही, तर त्यांची निर्मितीही करतात. याकरता त्यांनी 1993 मध्ये एक आर्केड मशीन तयार केली होती. इवांसनुसार त्यांच्या संग्रहात सोनिक द होजहॉगची अनेक कॅरेक्टर्स आणि त्याच्याशी निगडित अनेक गोष्टी आहेत. या गोष्टी त्यांनी इंटरनेटद्वारे जगभरातून शोधून काढत मागविल्या आहेत.