Tarun Bharat

भारतात पाठविण्यात आलेल्या पैशाचा विक्रम

100 अब्ज डॉलर्सचा आकडा पार, थेट विदेशी गुंतवणुकीपेक्षाही अधिक

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

या वर्षात विदेशात वास्तव्यास असणाऱया भारतीय नागरिकांनी भारतात पाठविलेल्या पैशाने विक्रमी स्तर गाठला आहे. आतापर्यंत 100 अब्ज डॉलर्सहून अधिक रक्कम पाठविण्यात आली असून ती भारतीय रुपयांमध्ये 8 लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ती 12 टक्क्यांहून अधिक असून यावर्षी आतापर्यंत झालेल्या थेट विदेशी गुंतवणुकीपेक्षा ती 25 टक्के अधिक आहे.

ही रक्कम मेक्सिको, चीन आणि फिलिपाईन्स या देशांच्या विदेशस्थ नागरिकांनी त्यांच्या देशांमध्ये पाठविलेल्या रकमेपेक्षा कितीतरी अधिक आहे. यामुळे भारताच्या विदेशी चलन साठय़ामध्येही वाढ झाली आहे. यावर्षी विदेशातून भारतात पाठविलेल्या पैशामध्ये प्रमुख वाटा अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर, जपान, ऑस्टेलिया आणि न्यूझीलंड येथे काम करणाऱया उच्चप्रशिक्षित कर्मचाऱयांचा आहे, अशीही माहिती देण्यात आली आहे. आखाती देशांमधून पाठविल्या जाणाऱया रकमेपेक्षा प्रगत देशांमधून पाठविली जाणारी रक्कम आता अधिक प्रमाणात आहे.

2016-2017 ते 2020-2021 या काळात भारतात अमेरिका, ब्रिटन आणि  सिंगापूर या देशांमधून पाठविण्यात आलेल्या पैशांचे प्रमाण 26 टक्क्यांवरुन 36 टक्के इतके झाले. तर सौदी अरेबिया, कुवेत, संयुक्त अरब अमिरात, ओमान आणि कतार या पाच आखाती देशांमधून पाठविण्यात येणाऱया पैशाचे प्रमाण 54 टक्क्यांवरुन 28 टक्क्यांपर्यंत घसरले आहे. 2020-21 मध्ये अमेरिकेतून भारतात पाठविलेल्या पैशाचे प्रमाण संयुक्त अरब अमिरातीतून पाठविलेल्या पैशांपेक्षा अधिक आहे. भारतात एकंदर पाठविण्यात आलेल्या पैशात अमेरिकेचा वाटा 23 टक्के आहे. भारतात पाठविल्या जाणारा हा पैसा (रेमिटन्स) भारतात होणाऱया थेट विदेशी गुंतवणुकीपेक्षाही 25 टक्के जास्त आहे. यंदा थेट विदेशी गुंतवणूक साधारणतः 80 अब्ज डॉलर्सची होईल असे केंद्र सरकारचे अनुमान आहे.

Related Stories

ओमिक्रॉनमध्ये आणखी परिवर्तन

Patil_p

अरविंद केजरीवाल यांची जयपूरमध्ये ध्यानसाधना

Patil_p

परराज्यातून घरी परतणाऱ्या बिहारी मजुरांचा खर्च बिहार सरकार करणार : नितीश कुमार

Tousif Mujawar

जम्मू काश्मीर : गंदरबलमध्ये अतिवृष्टी, ढगफुटीने उडाला हाहाकार

Archana Banage

अंटाक्टकातून दिसले वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण

Patil_p

उत्तरप्रदेशात हर्बल रस्त्यांचे काम पूर्ण

Patil_p