Tarun Bharat

घाऊक महागाई दर घसरणीमुळे दिलासा

जुलै महिन्यात 13.93 टक्के ः पाच महिन्यातील सर्वात कमी दर

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

किरकोळ महागाई दरातील घसरणीनंतर घाऊक मूल्य सूचकांक आधारित महागाई दरातही घट झाली आहे. जुलै महिन्यात घाऊक महागाई दर 13.93 टक्के इतका नोंदवण्यात आला. गेल्या चार-पाच महिन्यांच्या तुलनेत आता हा दर घसल्यामुळे सरकारसह सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळणार आहे. तथापि, सलग 14 महिन्यांपासून घाऊक महागाई दर हा 10 टक्क्मयांहून अधिक नोंदवण्यात आला आहे.

जुलै महिन्यापूर्वी सलग तीन महिने घाऊक महागाई दर 15 टक्क्मयांहून अधिक नोंदवण्यात आला होता. जून महिन्यात घाऊक महागाई दर 15.18 टक्के इतका नोंदवण्यात आला होता. तसेच मे महिन्यात हा दर 15.88 टक्क्मयांच्या आसपास होता. आता जुलै महिन्यात मागील पाच महिन्यातील सर्वात कमी घाऊक महागाई दर नोंदवण्यात आल्यामुळे महागाई कमी होण्याचे संकेत मिळत आहेत.

सलग दुसऱया महिन्यात घाऊक महागाई दरात घट नोंदवण्यात आली आहे. मागील एक वर्षांपासून घाऊक महागाई दर सातत्याने वाढत आहे. मात्र, जून आणि जुलै महिन्यात घाऊक महागाई दरात घट नोंदवण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात हा दर 13.43 टक्के इतका होता. त्यानंतर रशिया-युपेन युद्ध सुरू झाल्याने कच्च्या तेलाचे दर मोठय़ा प्रमाणावर वाढण्याबरोबरच जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढले होते. इंधनाबरोबरच खाद्यतेलाचे दरही प्रचंड वाढल्यामुळे महागाई दरात मोठी वाढ झाली.

खाद्यान्न महागाई 10 टक्क्यांच्या खाली

जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात खाद्य महागाई दरात घट झाली आहे. जुलैमध्ये खाद्यान्न महागाई दर 9.41 टक्के इतका नोंदवण्यात आला. तर, जून महिन्यात हा दर 12.41 टक्के होता. जुलै महिन्यात भाज्यांचा महागाई दर 18.25 टक्के होता. धान्य, गहू, डाळ आणि फळांचे दर जुलै महिन्यात वाढले आहेत.

किरकोळ महागाई दरातही घट

गेल्याच आठवडय़ात किरकोळ महागाई दर जाहीर झाला होता. जगातील अनेक देश महागाईमुळे त्रस्त असताना देशात किरकोळ महागाई घटली आहे. भारतात किरकोळ महागाई दर 6.71 टक्क्मयांवर आला आहे. मात्र, रिझर्व्ह बँकेने व्यक्त केलेल्या 6 टक्के दराच्या मर्यादेपेक्षा हा दर अधिक आहे. याआधी जून महिन्यात किरकोळ महागाई दर काही प्रमाणात कमी होऊन 7.01 टक्के इतका झाला होता. मे महिन्यात किरकोळ महागाई दर 7.04 टक्के इतका झाला होता. एप्रिल महिन्यात किरकोळ महागाई दर 7.79 टक्के इतका होता.

Related Stories

‘धन्वंतरी रथा’मुळे कोरोनाला खीळ

Patil_p

प्रियंका गांधींना UP पोलिसांनी घेतले ताब्यात

datta jadhav

पंजाब मुख्यमंत्र्यांच्या भाच्याला ईडीकडून अटक

Patil_p

पराभवाच्या अवलोकनासाठी काँगेसची समिती

Patil_p

दोन नौदल अधिकाऱयांचा ग्लायडर अपघातात मृत्यू

Patil_p

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे!

Patil_p