Tarun Bharat

विक्रमनगर येथील ज्वेलर्समधील चोरीचा छडा

राजारामपुरी पोलिसांकडून दोघांना अटक

प्रतिनिधी/कोल्हापूर

विक्रमनगर येथील खुशबू ज्वलेर्समध्ये झालेल्या चोरीचा राजारामपुरी पोलिसांनी 12 तासात छडा लावत दोघांना अटक केली आहे. सचिन शिवाजी आगलावे (वय 21 रा. शाहू कॉलनी स्वामी समर्थ मंदीर विक्रमनगर) व साहील चाँदसाहब गवंडी (वय 25 रा. नुराणी मशिद जवळ विक्रमनगर) अशी संशयितांची नांवे आहेत.

विक्रम नगर येथील खुशबु ज्वेलर्समध्ये 18 रोजी रात्री चोरी झाली होती. चोरटयाने दुकानातील चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 3 लाख 18 हजार 400 रुपये किमतीचा मुददेमाल लंपास केला होता.याबाबत साहील युसुफ पठाण विक्रमनगर यांनी तक्रारी दिली होती. राजारामपुरी पोलीसांनी तपास करुन 12 तासांच्या आत गुन्हयाचा छडा लावला. यामध्ये सचिन शिवाजी आगलावे व साहील चाँदसाहब गवंडी यांना अटक करण्यात आली आहे. चोरीस गेलेल्या मालाबाबत पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बी. बी. शिंदे करीत आहेत.

हे ही वाचा : विहिरीवरील पाण्याची मोटार चोरणाऱ्या चौघांना अटक

Related Stories

हुकूमशाही बघायची असेल तर ‘डी.वाय’मध्ये डोकावून बघा -अमल महाडिक

Archana Banage

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राज्यभर काम करावे

Archana Banage

बोगस डॉक्टर शोध मोहिम प्रभावीपणे राबवा – जिल्हाधिकारी

Archana Banage

कोल्हापूर : प्रसुतीवेळी गर्भवती महिलेचा बाळासह मृत्यू; डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Archana Banage

प्रारूप मतदार यादीची प्रसिद्धी लांबणीवर

Abhijeet Khandekar

काखे फाटा येथील आपघातात महाविद्यालयीन तरुण जागीच ठार; एक जखमी

Archana Banage