Tarun Bharat

मुले पळवणाऱ्या टोळीच्या अफवेने रत्नागिरीतील शाळेत गोंधळ

संशयास्पद महिलेला पोलिसांच्या केले स्वाधीन

Advertisements

प्रतिनिधी/रत्नागिरी

शहरातील शाळेत मुले पळवणारी टोळी आल्याचे अफवेने गुरूवारी सकाळी मोठा गोंधळ उडाल़ा शाळेत पालक संघाच्या बैठकीदरम्यान शाळा परिसरात फिरत असलेल्या अनोळखी महिलेमुळे पालकांच्या संतापाचा पारा चढल़ा यावेळी महिलावर्गातील पालकांनी या महिलेचा चांगलाच समाचार घेत तिला पोलिसांच्या स्वाधीन केल़े दरम्यान या महिलेचा कोणताही मुले पळवणाळऱ्या टोळीशी संबंध नसल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आल़े मात्र दिवसभर शहर परिसरात मुले पळवणाऱ्या महिलेला पकडल्याची अफवा पसरली होत़ी.

मागील काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात मुले पळवणारी टोळी फिरत असल्याची अफवा जोरदार पसरली आह़े या संबंधी समाजमाध्यमांवर काही मेसेज व व्हिडीओ फिरत असल्याने पालकवर्गात भीती निर्माण झाली आह़े. अशाच एका अफवेचा फटका शहरातील शाळेत आलेला एका महिलेला बसल़ा शहरातील महाविद्यालयाजवळ असलेल्या शाळेत गुरूवारी पालक संघाची बैठक आयोजित करण्यात आली होत़ी. यावेळी एक महिला पावती पुस्तक घेवून मुख्याध्यापकांना भेटण्यासाठी आल़ी. यावेळी शाळेतील शिपायानेही तिला गेटमधून आत सोडल़े.

हे ही वाचा : सराफ व्यापारी खून प्रकरण : दुर्गंधीची जागा हेरून फेकला मृतदेह

मुख्याध्यापकांचे केबीन शोधत असलेली ही महिला शाळेच्या आवारात फिरत असल्याचे शाळेतील शिक्षकांच्या निदर्शनास आल़े. यावेळी तिला हटकण्याचा प्रयत्न शिक्षकांनी केल़ा यानंतर ही महिला बाहेर जाण्यासाठी शाळेच्या गेटकडे वळल़ी. यावेळी पालक संघाच्या बैठकीसाठी आलेल्या काही पालकांच्या निदर्शनास ही महिला पडल़ी. यातील काही पालकांनी मैदानाकडे धाव घेत या महिलेला गेटवर अडवल़े तसेच तिच्याकडे चौकशी करण्यास सुरूवात केल़ी तर काहींनी मुले पळवणाऱ्या टोळीतील सदस्य असल्याचे समजून या महिलेचा समाचार घेतल़ा.

शहरातील शाळेत मुले पळवणारी टोळी आली असून एका महिलेला ताब्यात घेतल्याची अफवा सर्वत्र पसरल़ी यामुळे शहरभरातील सर्व नागरिक या शाळेत जमण्यास सुरूवात झाल़ी या महिलेला पालकांकडून शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल़े पोलिसांच्या तपासात ही महिला पावती पुस्तक घेवून शाळेत आली होती, अशी माहिती समोर आली आह़े कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आह़े.

Related Stories

ओएनजीसी जहाजावरील चौघे पॉझिटिव्ह

Patil_p

Chiplun: रेशन धान्याची परस्पर विकी, दुकानदाराचा परवाना रद्द

Archana Banage

खासगी दवाखान्यांतीलही सर्दी, ताप, रुग्णांची माहिती घेतली जाणार

Patil_p

‘कलकाम’कडून 17 कोटीची फसवणूक!

Patil_p

कोस्टगार्डमध्ये नोकरीच्या आमिषाने 65 लाखाचा गंडा

Patil_p

Ratnagiri; पेट्रोल ओतून पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!