Tarun Bharat

भिकाऱयांच्या मुलांसाठी सुरू केली शाळा

Advertisements

पोलीस उपनिरीक्षकाचे कौतुकास्पद कार्य

पोलीस विभागात एक असा उपनिरीक्षक आहे, जो स्वतःच्या डय़ुटीनंतर मिळालेल्या वेळेत लोकसेवा करत आहे. पोलीस उपनिरीक्षक रणजीत यादव हे सध्या अयोध्येतील पोलीस महासंचालक कार्यालयात तैनात आहेत. रक्तदान, वृक्षारोपण, पशुपक्ष्यांच्या सेवेसह आता त्यांनी भिक मागून जगणाऱया लोकांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचे काम सुरू केले आहे.

यादव यांची शाळा नोव्हेंबर 2021 पासून सुरू आहे. यात सध्या 65 मुले शिकत आहेत. भीग मागणाऱया लोकांच्या मुलांचा प्रश्न यादव यांनी अयोध्येतील नया घाट पोलीस स्थानकात तैनात असताना लक्षात आला. या भागात कुष्ठरोगाने आजारी लोक घाटांवर भीक मागताना दिसून येतात. त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला होता. आता अशा निराश्रित मुलांसाठी शाळा सुरू केल्याचे यादव यांनी सांगितले.

सध्या पोलीस म्हणून स्वतःची डय़ुटी पूर्ण केल्यावर वेळ काढून या मुलांना शिकवत आहे. मुलांना शिक्षणासाठीची सामग्री म्हणजेच वही, पुस्तक, पेन, खडू, रबर इत्यादी स्वतःच्या खर्चातून पुरवत आहे. तसेच त्यांच्या पालकांना शिक्षणाद्वारेच गरीबी दूर होऊ शकते याची जाणीव करून देत असल्याचे यादव यांनी सांगितले आहे.

Related Stories

मृतदेहासमवेत दीड वर्षे वास्तव्य

Patil_p

जगातील सर्वात मोठे मांजर

Patil_p

शर्यतीची बैलं पुन्हा लागली फुरफुरु

Sumit Tambekar

28 हजार कासवांचे वाचविले प्राण

Patil_p

गुगलकडून ‘कोरोना वॉरियर्स’ साठी खास डुडल

prashant_c

30 वर्षांनी दृष्टीस पडले ‘भूत गाव’

Patil_p
error: Content is protected !!