Tarun Bharat

तपासी रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याच्या कारच्या धडकेत शाळकरी मुलगा ठार

इचलकरंजी / प्रतिनिधी

शहरालगतच्या शहापूरमधील गणेशनगरातील एका गुन्हेगाराला समन्स बजावणीसाठी आलेल्या मिरज रेल्वे पोलीस कर्मचायाच्या गाडीने खेळत असलेल्या शाळकरी मुलाचा जोराची धडक दिली. या धडकेने गंभीर जखमी झालेल्या राज सुरेश चव्हाण (वय 12 वर्षे रा . आरोमा बेकरीशेजारी, गणेशनगर, शहापूर, ता . हातकणंगले ) या शाळकरी मुलाचा उपचारापूर्वी मृत्यु झाला. हा अपघात शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी मिरज रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी सुर्यकांत आप्पासो कांबळे ( रा. भारतमाता हौसींग सोसायटी, इचलकरंजी) यांच्या विरोधी शहापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी अपघातातील त्यांची खासगी कार जप्त केली आहे.

घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संशयीत आरोपी सुर्यकांत कांबळे हे मिरज रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. शहरालगतच्या शहापूरमधील गणेशनगरातील एका गुन्हेगाराला न्यायालयाचे समन्स लागू करण्यासाठी खासगी कारने शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आले होते. यावेळी ते त्या संबंधीत गुन्हेगाराचा पत्ता विचारण्यासाठी गणेशनगरातील एका माजी नगरसेवकाकडे गेले. जाताना त्यांनी कारचा हॅन्डब्रेक न लावता तसेच गिअरमध्ये न ठेवता, उतरतीला लावली. ही कार अचानक उतारतीवरून सुरु होऊन, सुमारे 50 फुटावर खेळत असलेल्या शाळकरी मुलाच्या घोळक्यात पाठीमागून शिरली. मित्राच्या बरोबर खेळात मग्न असलेल्या राज चव्हाण या शाळकरी मुलाला फरफटत नेले. यात तो गंभीर जखमी झाला. या अपघाताची माहिती समजताच नगरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि राजला उपचारासाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. पण त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी येथील इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यु झाला. याची माहिती मिळताच नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी इंदिरा गांधी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. यांची दखल घेवून रुग्णालय परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये. याकरिता मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Related Stories

काय झाले होते हो, 1857 साली?…

Archana Banage

कुरुंदवाडचे बाप्पा चालले जर्मनीला…. !

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात दोन, शहरात आठ नवे कोरोना रुग्ण

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यातील महापूर ओसरण्याची गती होतेय संथ

Archana Banage

हीच वेळ हद्दवाढीची!

Archana Banage

कोल्हापूर : वितरकांचा दूध विक्री बंदचा निर्णय मागे

Archana Banage