Tarun Bharat

सचिन वाझे मातोश्रीवर दरमहिन्याला शंभर कोटी पाठवायचा; शिंदे गटाच्या खासदाराचा ठाकरेंवर गंभीर आरोप

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड केल्यांनतर त्यांच्यासोबत ४० आमदार आणि १२ खासदार सोबत गेले. यांनतर शिवसेनेकडून शिंदे गटासोबत गेलेल्या नेत्यांनी ५० खोके घेतल्याचा आरोप वारंवार केला जात आहे. शिंदे गट आणि शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप केलेलं जात असताना आता शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी उद्धव ठाकरेंवर गम्भीर आरोप केला आहे. सचिन वाझे (Sachin Waze) हे महिन्याला १०० कोटी रुपये मातोश्रीवर(Matoshree) पाठव होते, असा खळबळजनक आरोप जाधव यांनी केल्याने नव्याने राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

राज्यात पालकमंत्र्यांची नेमणूक केल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे पहिल्यांदाच बुलढाण्यात आले होते. त्यावेळी खासदार प्रतापराव जाधव समर्थकांनी मेहकरमध्ये त्यांचं जंगी स्वागत केलं. त्यावेळी बोलताना प्रतापराव जाधवांनी थेट उद्धव ठाकरेंवर टीकेचे बाण सोडले आहेत. उद्धव ठाकरे सत्तेत असताना शंभर खोके एकदम ओके अशा पद्धतीनं मातोश्रीवर सचिन वाझे दरमहिन्याला पैसे जमा करत होते, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळं आता शिंदे गटानं ठाकरेंवर केलेल्या या आरोपांमुळं नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : बाळासाहेबांनी केलेली युती कोणालाही तोडता येणार नाही

दरम्यान शिंदे गट आणि शिवसेनेचा दसरा मेळावा काही तासांवर येऊन ठेपलेला असताना आता दोन्ही गटांत आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगला आहे. शिवसेनेला दादरमधील शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी मिळाली असून शिंदे गट बीकेसीवर दसरा मेळावा घेणार आहे. त्याआधी शिंदे गटानं मेळाव्याचे दोन टीझर जारी केले असून शिवसेनेनंही एक टीझर जारी केला आहे.

Related Stories

सातारा जिल्हा हादरला; नवीन ४० रुग्णांची भर

Archana Banage

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूषखबर! मराठीतून परीक्षा देता येणार,औरंगाबाद खंडपीठाचे राज्य शासनाला निर्देश

Archana Banage

रेठरेधरणच्या ‘त्या’रुग्णाच्या रिपोर्ट बाबत संशय?

Archana Banage

‘या’ विद्यार्थ्यांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्यास मुभा

Tousif Mujawar

विधानपरिषदेबाबत ‘मनसे’चा सस्पेन्स; मतदानाबाबत काय म्हणाले आमदार

Abhijeet Khandekar

महाविकास अघाडीच्या आमदारांकडेही रेमडेसिव्हीरचा साठा ; मनसेच्या नेत्याचा आरोप

Archana Banage
error: Content is protected !!