जीव वाचविण्यासाठी लोकांनी घेतली उडी
वृत्तसंस्था/ मनीला
फिलिपाईन्सच्या एका बेटाच्या दिशेने प्रवास करत असलेल्या जहाजाला आग लागली आहे. आग लागल्याचे कळताच प्रवाशांमध्ये खळबळ उडाली तर अनेकांनी जीव वाचविण्यासाठी समुद्रात उडी घेतली आहे. या घटनवेळी जहाजातून 87 जण प्रवास करत होते. ओरिएंटल मिंडोरो प्रांताच्या कालापन शहरापासून दक्षिण मनीला बंदराच्या दिशेने हे जहाज होते. बंदरापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर जहाजातून धूर निघू लागला होता. आग लागल्याचे कळताच फिलिपाईन्सच्या तटरक्षक दलाने त्वरित पावले उचलत सर्व प्रवाशांना वाचविले आहे. एम/व्ही एशिया फिलिपाईन्स नावाच्या जहाजात 38 चालक दलाचे सदस्य अन् 49 प्रवासी होते. तर जहाजात किमान 16 कार अन् ट्रक देखील होता. आग लागण्यामागील कारणांचा शोध घेतला जात असल्याचे एका अधिकाऱयाने म्हटले आहे.
फिलिपाईन्समध्ये सागरात होणाऱया दुर्घटनांचे प्रमाण अधिक आहे. या भागात वादळांचे प्रमाण अधिक असल्याने दुर्घटना देखील मोठय़ा प्रमाणात घडत असतात. जहाजांची खराब स्थिती देखील दुर्घटनांसाठी कारणीभूत ठरते. अनेक जहाजांची दुरुस्ती वेळेवर केली जात नाही. तसेच मरीनटाइम सेफ्टी सिस्टीम देखील कमजोर असल्याचे एका अधिकाऱयाने सांगितले आहे.